दक्षिण चीन समुद्रात चीनने तैनात केले रॉकेट लाँचर्स
By admin | Published: May 17, 2017 03:34 PM2017-05-17T15:34:56+5:302017-05-17T15:35:28+5:30
संपूर्ण दक्षिण चीन सागरावर हक्क सांगणा-या चीनने येथील वादग्रस्त भागात रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 17 - संपूर्ण दक्षिण चीन सागरावर हक्क सांगणा-या चीनने येथील वादग्रस्त भागात रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत. विएतनामच्या दिशेने हे रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत. मागच्या काही काळापासून चीनने दक्षिण चीन सागरात मोठया प्रमाणावर सैन्याची जमवाजमवी सुरु केली असून, चीनच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेचे बारीक लक्ष आहे. दक्षिण चीन समुद्रात आमच्या ताब्यात जी बेटे आहेत तिथे आम्ही मर्यादीत प्रमाणात लष्करी तळ उभारले असून तिथे लष्करी सिद्धतेची आवश्यकता आहे असे चीनने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे.
अमेरिकेने चीनच्या दक्षिण चीन सागरातील वाढत्या लष्करी हालचालींवर टीका केली आहे. चीनने नॉरीनको सीएस/एआर-1 55 एमएम रॉकेट लाँचर तैनात केले असून, यामध्ये शत्रू नौकांना शोधून हल्ला करण्याची क्षमता आहे. फियरी क्रॉस रीफ बेटावर हे लाँचर्स तैनात केले असून, या भागावर व्हिएतनाम, तैवान आणि फिलीपाईन्स या देशांनीही दावा केला आहे. चीन इथे विमानतळाची उभारणी करत आहे.
अमेरिकेच्या इशा-याला न जुमानता चीन लवकरच दक्षिण चिनी समुद्रातील छोट्या छोट्या बेटावर बांधकाम सुरू करण्याची योजना आखल्या आहेत. फिलिपिन्सनं या प्रकरणात चीनच्या विरोधात पर्मनन्ट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये खटला भरला आहे. त्यावेळी कोर्टानंही चीनच्या विरोधात निर्णय दिला होता. चीनजवळ असा कोणताही पुरावा नाही, जो दक्षिण चिनी समुद्रावर चीनचा मालकी हक्क असल्याचं स्पष्ट करू शकेल. मात्र चीननं हा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला होता.
दक्षिण चिनी समुद्र हा केवळ आंतरराष्ट्रीय व्यापाराचं माध्यम नाही, तर इथे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा आहे. नैसर्गिक साधनांच्या बाबतीत दक्षिण चिनी समुद्र हा खूप समृद्ध आहे. चीननं 2012साली योजनाबद्धरीत्या स्काबरा शोआल क्षेत्रातील काही बेटांवर कब्जा केला होता. अमेरिकेनं या वादग्रस्त क्षेत्रात कोणतंही निर्माण करून नये, असा इशारा आधीच चीनला दिला होता. मात्र चीन अमेरिकेच्या या इशा-याकडे दुर्लक्ष करत दक्षिण चिनी समुद्रात बांधकाम सुरू करण्याच्या विचारात आहे. दक्षिण चिनी समुद्राच्या सुरक्षेखातर चीन इथं प्रशिक्षण केंद्र बनवण्याच्या तयारीत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातूनच चीन इतर देशांवर लक्ष ठेवणार आहे.