रॉकेट लाँचर, लेजर ऑपरेटर, स्नायपर..., आता पाकिस्तानात हाहाकार माजणार? तालिबान कमांडरचा खतरनाक प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 05:49 PM2024-03-25T17:49:30+5:302024-03-25T17:50:39+5:30

“सर्व मुजाहिदीन अमीर अल-मुमिनीनच्या आदेशाचे पालन करण्यास तयार आहेत आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठीही तयार  आहेत," असा दावाही याह्याने केला आहे.

Rocket launchers, laser operators, snipers will cause havoc in Pakistan Taliban commander's dangerous plan | रॉकेट लाँचर, लेजर ऑपरेटर, स्नायपर..., आता पाकिस्तानात हाहाकार माजणार? तालिबान कमांडरचा खतरनाक प्लॅन

रॉकेट लाँचर, लेजर ऑपरेटर, स्नायपर..., आता पाकिस्तानात हाहाकार माजणार? तालिबान कमांडरचा खतरनाक प्लॅन

अफगाण तालिबान कमांडर याह्या याने पाकिस्तानी संरक्षण दलां विरोधात एक प्रक्षोभक भाषण केले आहे. या भाषणात त्याने तहरीक-ए-तालिबानपाकिस्तान (TTP) कॅडरला “पाकिस्तानात घुसखोरी करून बदला घेण्याचे” आवाहन केले आहे. जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या लीक झालेल्या व्हिडिओमध्ये याह्या प्रतिबंधित टीटीपीचा एक गट असलेल्या हाफिज गुल बहादूर या दहशतवादी समूहाच्या दहशतवाद्यांच्या सभेते बोलताना दिसत आहे. 

“सर्व मुजाहिदीन अमीर अल-मुमिनीनच्या आदेशाचे पालन करण्यास तयार आहेत आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठीही तयार  आहेत," असा दावाही याह्याने केला आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, “पाकिस्तानात कशा पद्धतीनी घुसखोरी करावी आणि कुठल्याही जखमी व्यक्तीला मागे सोडू नये," अशी सूचना याह्या दहशतवाद्यांना देत आहे.

जियो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ अफगाणिस्तानच्या डांगर अल्गाद भागातील आहे. व्हिडिओमध्ये दहशतवादी पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी सहमत होतानाही दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये याह्या पश्तोमध्ये एका आत्मघाती हल्लेखोरासह शस्त्रसज्ज लोकांसोबत बोलतानाही दिसत आहे. 

एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, येऊ घातलेल्या हल्ल्या संदर्भात चर्चा करताना तो, “सहा रॉकेट लॅन्चर आणि सहा सहकारी असतील, याशिवाय दोन लेजर ऑपरेटर आणि त्याचे सहायक, याच बरोबर एक स्नायपरही असेल.” अशी सूचनाही दहशतवाद्यांना देत आहे.

Web Title: Rocket launchers, laser operators, snipers will cause havoc in Pakistan Taliban commander's dangerous plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.