बांगलादेशातील रोहिंग्या कॅम्पमध्ये 9 महिन्यात 16 हजार बाळांचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 12:53 PM2018-05-18T12:53:27+5:302018-05-18T12:53:27+5:30
गेल्या वर्षी रोहिंग्यांना घरदार सोडून म्यानमारमधून पळून जावे लागले होते.
ढाका- म्यानमारमधील रखाइन प्रांतातील रोहिंग्या लोक गेल्या वर्षी जीव मुठीत घेऊन बांगलादेशाच्या दिशेने पळाले होते. हत्या आणि अत्याचाराच्या सत्राला घाबरून पळालेल्या रोहिंग्यांचे प्रश्न आजही संपलेले नाहीत. युनीसेफने दोन दिवसांपुर्वी दिलेल्या अहवालामध्ये बांगलादेशात असणाऱ्या रोहिंग्यांच्या छावणीमध्ये 9 महिन्यांमध्ये 16 हजार मुलांचा जन्म झाला आहे. या छावणीमध्ये 7 लाख रोहिंग्या राहात आहेत.
म्यानमारमधील नागरिक, तेथील लष्कर आणि रोहिंग्या यांच्यामध्ये झालेल्या तणावात्मक परिस्थितीमुळे रोहिंग्यांना घरेदारे सोडून पळून जावे लागले होते. हे लोक चालत किंवा समुद्रमार्गाने बांगलादेशासह इतर अनेक देशांमध्ये आश्रयासाठी गेले. त्यातील बहुतांश लोक बांगलादेशातील कॉक्स बझार येथे गेले नऊ महिने राहात आहेत.
16,000 babies have been born in Rohingya refugee camps in Bangladesh since September, says @UNICEF.
— AJ+ (@ajplus) May 17, 2018
Only 1 in 5 of those mothers had access to health facilities. pic.twitter.com/i8Sp5AKHmA
याबाबत बोलताना युनिसेफचे बांगलादेशातील प्रतिनिधी एडुआर्ड बेजर म्हणाले, दिवसाला सुमारे 60 या संख्येने बालकांचा जन्म होत आहे. या बालकांच्या माता छळ, हिंसा, बलात्कार अशा विविध गुन्ह्यांना तोंड देऊन येथे आलेल्या आहेत. तसेच कॅम्पमध्ये नक्की किती बालकांचा जन्म झाला आहे याचा खरा आकडा समजणे कठिण आहे असेही बेजर यांनी सांगितले. सेव्ह द चिल्ड्रेन या अभ्यासानुसार 2018 साली रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये 48 हजार मुले जन्मास येतील असा अंदाज व्यक्त केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार बांगलादेशी आरोग्य अधिकाऱ्यांनी 18,300 गरोदर महिला छावणीत असल्याची माहिती मिळालेली होती मात्र ही संख्या 25 हजारही असण्याची शक्यता आहे.
17-year-old Rohingya refugee, Fatema, is 8 months pregnant.
— UNICEF (@UNICEF) May 17, 2018
She doesn’t know if the father is her deceased husband or the soldier who raped her.
It’s been 9 months since a wave of violence forced thousands to flee Myanmar. #ChildrenUnderAttackpic.twitter.com/DoTVgiB3mJ