रोहिंग्या निर्वासितांना साथीच्या आजारांचा धोका; पाच लाख लोकांची अवस्था अतिशय वाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:33 AM2017-10-01T02:33:34+5:302017-10-01T02:33:41+5:30
येथील निर्वासितांच्या छावणीत सुमारे ५ लाख रोहिंग्या मुस्लिम अत्यंत भीषण स्थितीत राहत असून, गलिच्छ बनलेल्या या परिसराला साथरोगांचा गंभीर धोका आहे.
कोक्स बाजार (बांगलादेश) : येथील निर्वासितांच्या छावणीत सुमारे ५ लाख रोहिंग्या मुस्लिम अत्यंत भीषण स्थितीत राहत असून, गलिच्छ बनलेल्या या परिसराला साथरोगांचा गंभीर धोका आहे.
म्यानमारमधून बाहेर पडलेले रोहिंग्या मुस्लिम मोठ्या प्रमाणात कोक्स बाजार छावणीत येत आहेत. ही जगातील सर्वांत मोठी
निर्वासित छावणी बनली आहे.
अत्यंत कमी जागेत हे लोक राहत आहेत. तसेच पिण्याचे स्वच्छ
पाणी आणि स्वच्छतागृहांची
पुरेशी सोयही नाही. त्यामुळे हा संपूर्ण परिसर साथ रोगांच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे.
संयुक्त राष्टÑांनी या निर्वासितांच्या छावणीवर महासंकट घोंघावत असल्याचा इशारा दिला आहे. साथरोग पसरल्यास त्याचा मुकाबला करण्याची तयारी येथे नाही.
या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे साथींचा धोका
आणखी वाढला आहे. अतिसाराच्या रुग्णांची संख्या येथे वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलांमध्ये हा आजार अधिक आहे. निर्वासित लोक उघड्यावर शौचास बसतात.
पाऊस ही घाण तिथल्या पाण्याच्या स्रोतांत आणून मिसळवितो. हेच पाणी लोक पितात.
या छावणीत आजारी निर्वासितांना वैद्यकीय सेवा
देण्यासाठी एकच डॉक्टर आहे.
त्याच्या क्लिनिकपुढे रुग्णांच्या रांगा असतात. पावसातही लोक रांगा सोडत नाहीत. डॉ. अलामुल हक रोज
४00 यांनी सांगितले की, आधी
पालक एक-दोन मुले घेऊन क्लिनिकमध्ये येत. आता तीन ते चार मुले सोबत असतात.
ना पाणी, ना स्वच्छतागृहे
एका रोहिंग्या व्यक्तीने सांगितले की, पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांग असतात. पाणी पुरेसे मिळत नाही. हसीना बेगम या रोहिंग्या महिलेने सांगितले की, संडाससाठी शेकडो लोक रोज रांगेत उभे राहतात.
मुलांसाठी ही मोठी समस्या आहे. डोंगराच्या बाजूने काही संडास आहेत. पण ते नुसतेच खड्डे आहेत. ते आता मलमूत्राने भरून गेले आहेत.