राँग नंबर - 28 वर्षीय तरुणाने केले 82 वर्षाय महिलेशी लग्न
By Admin | Published: February 27, 2017 06:42 PM2017-02-27T18:42:34+5:302017-02-27T18:42:34+5:30
तुम्हाला अथवा तुमच्या जवळ्याच्या व्यक्तीला अनेकदा राँग नंबरवरुन फोन येत असतील. पण राँगनंबर वरुन फोन आल्यानंतर कोणी एकमेंकाच्या प्रेमात पडले असे क्वचितच घडते
ऑनलाइन लोकमत
इंडोनेशिया, दि. 27 - तुम्हाला अथवा तुमच्या जवळ्याच्या व्यक्तीला अनेकदा राँग नंबरवरुन फोन येत असतील. पण राँगनंबर वरुन फोन आल्यानंतर कोणी एकमेंकाच्या प्रेमात पडले असे क्वचितच घडते. अशीच घटना इंडोनेशिया मधिल एका 28 वर्षीय तरुणा सोबत घडली आहे. त्याला एका राँग नंबरवरुन फोन आला ते दोघेही प्रेमात पडले पण ज्यावेळी वस्तूस्थिती समजली त्यावेळी त्याच्या पायाखालील जमीन सरकली. तो ज्या महिलेशी बोलतं होता ती 82 वर्षीय विधवा होती. ही वस्तूस्थिती पाहिल्यानंतरही तो डगमगला नाही.
इंडोनिशिया मध्ये राहणारा 28 वर्षीय सोफयां लोहो डानडेल याला एक दिवशी अचानक राँग नंबर वरुन फोन आला. समोरुन मधूर आवाजात महिला बोलतं होती. तिच्या मधुर आवाजाने त्याला मोहित केले. पहिल्या कॉलनंतर त्यांचे सतत बोलणं सुरु झाले आणि दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुलला. तो फोनवरून ज्या महिलेशी बोलत होता तिचे नाव मार्था पोटू होते. अनेक दिवस सतत बोललल्यानंतर दोघांमधील प्रेम एवढे वाढले की, एक दिवस मार्थाला भेटण्यासाठी सोफयां तिच्या घरी गेला.
दारावरील बेल वाजवली समोर 82 वर्षीय महिलेने दार उघडले. त्याने तीचे नाव विचारले त्या महिलेने आपले नाव मार्था असल्याचे सांगताच त्याच्या पायाखालची जमीन घसरली. पण मार्थाची हकीकत कळल्यानंतर सोफयां लोहोला दु:ख झाले. तिच्या बद्दलचा आदर अधिक वाढला. आणि त्याचे प्रेम अधिक भक्कम झाल्याचे त्याने सांगितले.
मार्थाच्या पतीचे निधन दहा वर्षापूर्वी झाले. तीला दोन मुले आहेत. ते दोघेही नोकरीनिम्मत बाहेर असतात त्यामुळे घरात ती एकटीच राहते. मार्थापुर्वी मी कोणालाही डेट केले नाही असेही त्याने सांगितले. सोफयांने मार्थाला लग्नाची मागणी घातली, प्रथम मार्थाच्या कुटुंबियांनी या विवाहाला विरोध केला होता. मात्र नंतर त्यांनी या नात्याचा स्वीकार केला आणि दोघे विवाहबद्ध झाले.