फोक्सवॅगनच्या फ्रेंच मुख्यालयावर धाडी
By admin | Published: October 18, 2015 10:07 PM2015-10-18T22:07:49+5:302015-10-18T22:07:49+5:30
फोक्सवॅगनच्या फ्रेंच मुख्यालयावर पोलिसांनी रविवारी धाडी टाकल्या. प्रदूषणाच्या सॉफ्टवेअर घोटाळ्यात कंपनीचे पाय खोलात जात असल्याचे हे चित्र आहे.
पॅरिस : फोक्सवॅगनच्या फ्रेंच मुख्यालयावर पोलिसांनी रविवारी धाडी टाकल्या. प्रदूषणाच्या सॉफ्टवेअर घोटाळ्यात कंपनीचे पाय खोलात जात असल्याचे हे चित्र आहे.
फोक्सवॅगन कंपनीने फ्रान्समध्ये एक लाखाहून अधिक कार विकल्या आहेत. या कारमध्ये असे सॉफ्टवेअर आहे, की जे प्रदूषण चाचणीच्या वेळी अचूक नोंद दाखविते. वस्तुत: ही कार नियम पायदळी तुडवून चाळीसपट अधिक प्रदूषण करीत असल्याचे एका चाचणीत यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
फ्रान्सच्या उत्तर भागात पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयावर या धाडी टाकल्या. काही कागदपत्रे आणि संगणकाची पोलिसांनी पडताळणी केली. फोक्सवॅगनच्या सॉफ्टवेअर घोटाळ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटत आहेत.