एचएसबीसी कार्यालयावर धाडी

By admin | Published: February 19, 2015 12:19 AM2015-02-19T00:19:54+5:302015-02-19T00:19:54+5:30

मनी लाँड्रिंगच्या आरोपाच्या चौकशीतहत स्वीस पोलिसांनी एचएसबीसी कार्यालयांची झाडाझडती घेतली. अलीकडेच या बँकेतील खातेदारांच्या तपशिलासह यादी उघड झाल्यापासून ही बँक चर्चेत आहे.

Route to the HSBC office | एचएसबीसी कार्यालयावर धाडी

एचएसबीसी कार्यालयावर धाडी

Next

बँकेवर मनी लाँड्रिंगचा आरोप : स्वीस पोलिसांची कारवाई; फौजदारी प्रक्रिया केली सुरू
जिनेव्हा : मनी लाँड्रिंगच्या आरोपाच्या चौकशीतहत स्वीस पोलिसांनी एचएसबीसी कार्यालयांची झाडाझडती घेतली. अलीकडेच या बँकेतील खातेदारांच्या तपशिलासह यादी उघड झाल्यापासून ही बँक चर्चेत आहे. या यादीत १,१९५ भारतीयांच्या नावांचाही उल्लेख होता. ग्राहकांना कोट्यवधी डॉलरचा कर चुकविण्यासाठी मदत केल्याचा एचएसबीसी बँकेवर आरोप आहे.
एचएसबीसीच्या जिनेव्हा शाखेतील १ लाखांहून अधिक खातेदारांचा तपशील पत्रकारांच्या एका चमूने उघड केल्यापासून ही बँक चौकशीच्या घेऱ्यात आली असून सरकारी अभियोक्त्याने या बँकेविरुद्ध फौजदारी प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेसोबत मनी लाँड्रिंगमागे असलेल्या अज्ञात संशयितांचीही चौकशी केली जात आहे. चौकशीची व्याप्ती वाढविण्याची शक्यता असल्याचे सरकारी अभियोक्त्यांनी सांगितले. एचएसबीसीचे जाळे जवळपास २०० देशांत असून ११९ अब्ज अमेरिकन डॉलरचा कर चुकविण्यासाठी या बँकेने ग्राहकांना मदत केल्याचा दावा ही यादी फोडणाऱ्या पत्रकारांच्या चमूने केला आहे. यादीत मान्यवरांचीही नावे असल्याचा दावाही करण्यात आला होता. बँकेच्या स्वीत्झर्लंडमधील प्रायव्हेट बँकिंग विभागातील खात्यांमध्ये आणखी ११९५ भारतीयांची नावे असून त्यांच्या खात्यावर एकूण २५ हजार ४२० कोटी रुपये जमा असल्याच्या वृत्ताने देशभरात खळबळ उडाली आहे. या यादीत १,६६८ भारतीय आहेत. दुबार नावे आणि अन्य काही घटक विचारात घेता कारवाईयोग्य प्रकरणांची संख्या १,१९५ आहे. दरम्यान, ‘द डेली टेलिग्राफ’चे राजकीय भाष्यकार पीटर ओबॉर्न यांनी एचएसबीसी कर घोटाळ्याच्या वृत्ताच्या मुद्यावरून राजीनामा दिला आहे. (वृत्तसंस्था)

स्वीस बँकेत कर चुकवून किंवा अवैध मार्गाने कमावलेला पैसा जमा होणार नाही, यासाठी काय उपाय योजण्यात आले आहेत, असे विचारले असता स्वीस सरकारने सांगितले की, २००९ पासून स्वीस सरकारने वित्तीय बाजार धोरणात बदल केला आहे. तसेच कर चुकवेगिरीविरुद्ध धोरण घेत आंतरराष्ट्रीय मापदंडांचा स्वीकार केला आहे.
यदीत दाखविण्यात आलेल्या २,६९९ खात्यांपैकी १,६८८ खाते भारतीयांशी संबंधित आहेत. यापैकी १,४०३ खाते १९६९ आणि २००६ दरम्यान उघडण्यात आली आहेत.
याआधी एचएसबीसीच्या जिनेव्हा शाखेतील ६२८ भारतीयांच्या खात्यांची यादी फ्रान्सकडून भारताला देण्यात आली होती.

Web Title: Route to the HSBC office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.