हिंदू एकजुटीमुळे समाज बांधणीला नवी दिशा मिळेल - मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 10:37 AM2018-09-08T10:37:33+5:302018-09-08T10:40:54+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करायला हवं असं आवाहन केलं आहे.
शिकागो - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू बांधवांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करायला हवं असं आवाहन केलं आहे. हिंदू एकजुटीमुळे समाज बांधणीला नवी दिशा मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील शिकागो येथे स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित केलेल्या विश्व हिंदू संमेलनात ते बोलत होते. या कार्यक्रमाला 2500 पेक्षा अधिक लोकांनी हजेरी लावली होती.
हिंदू समाजात प्रतिभावान लोकांची संख्या सर्वात जास्त आहे. मात्र ते एकत्र येत नाहीत. हिंदूंचं एकत्र येणं थोडं कठिण आहे. हिंदू समाज एकत्र आला आणि तो एकसंध राहिला पाहिजे तरच या समाजाची प्रगती होईल असेही त्यांनी म्हटले आहे. हजारो वर्षांपासून हिंदू समाजाची फसवणूक होत आहे कारण हिंदू समाज आपले मूळ सिद्धांत विसरला. आपण एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं भागवत म्हणाले. 11 सप्टेंबर 1893 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी शिकागो मध्ये आयोजित विश्व धर्म संसदेत ऐतिहासिक भाषण केलं होतं. त्या 125 वर्षे पूर्ण झाली आहेत.