भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 11:17 AM2020-06-10T11:17:56+5:302020-06-10T15:11:58+5:30
पीओके, गिलगिट, बाल्टिस्तानवरून गेल्या महिनाभरापासून भारत पाकिस्तानमध्ये तणाव आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. यावर भारताने वेळोवेळी पाकिस्तानला हा भाग खाली करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिक कोरोनाच्या दहशतीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
कराची : भारतासोबत तणावाचे वातावरण असल्याने सध्या पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पाकिस्तानने भारतीय सैन्याची किती धास्ती घेतलेली आहे, याची प्रचिती काल रात्री आली. एका अफवेने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आणि अख्ख्या कराचीची लाईट घालविण्याची वेळ आली.
पाकिस्तानमध्ये सोशल मिडीयावर पसरलेल्या अफवेने नागरिकांसह सैन्याची झोप उडाली होती. गेल्या काही वर्षांत भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करत पाकड्यांच्या मनात धडकी भरवलेली आहे. हवाई दलासोबत झालेल्या एअर स्ट्राईकवेळीही पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले होते. यामुळे भारत पुन्हा हल्ला करू शकतो, अशी भीती पाकिस्तान्यांच्या मनात घर करून राहिली आहे.
पीओके, गिलगिट, बाल्टिस्तानवरून गेल्या महिनाभरापासून भारत पाकिस्तानमध्ये तणाव आहे. पाकिस्तानने गिलगिट बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. यावर भारताने वेळोवेळी पाकिस्तानला हा भाग खाली करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिक कोरोनाच्या दहशतीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
Confirmation: Pak jets hovering over skies of Karachi while there is a blackout in the whole area. Panic situation while Karachi port also on alert now. Pak fearing Air + Naval strike. Looks unlikely though. 🇮🇳 https://t.co/cn0zLnlRIXpic.twitter.com/BmccdAMgDI
— FrontalAssault (@FrontalAssault1) June 9, 2020
पाकिस्तानी सोशल मिडीयावर अफवा पसरली की काही अज्ञात लढाऊ विमाने कराचीच्या आकाशात घिरट्या घालू लागली आहेत. बस् एवढ्या एका अफवेने पाकिस्तानी सरकारसह सैन्याची घाबरगुंडी उडाली आणि पाकिस्तानची लढाऊ विमाने हवेत झेपावली. लोकांना काय होत आहे, ही उडत असलेली विमाने कोणाची आहेत? कशाचाही थांगपत्ता लागत नव्हता. खबरदारी म्हणून मग अख्ख्या कराची शहराची लाईट काढण्यात आली.
पाकिस्तानमधील सोशल मिडीयावर कथित लढाऊ विमाने घिरट्या घालत असल्याचे व्हिडीओ शेअर होऊ लागले. कराचीच्या लोकांनीच हे ट्विट केले आहेत. यामुळे पाकिस्तानी हवाई दलाने कोणतीही खातरजमा न करता स्वत:ची लढाऊ विमाने पाठविली आणि गोंधळात भर पडली.
ब्लॅकआऊट का करतात?
सध्याची लढाऊ विमाने ही जीपीएस गायडेड आहेत. तरीही शत्रूची विमाने हल्ला करण्याच्या उद्देशाने परराष्ट्रात घुसलेली असतात. त्यांना तो भाग नवखा असतो. यामुळे रात्रीच्या वेळी मोठा विध्वंस टाळण्यासाठी किंवा या विमानांना संभ्रमात टाकण्यासाठी दाटीवाटीच्या शहरांची वीज घालविली जाते. यामुळे खाली अंधार असल्याने पायलटांना अंदाज येत नाही व हल्ला टाळला जातो. विमानांचे लक्ष्य चुकल्याने हल्ला झाला तरीही नुकसान होत नाही.
अन्य महत्वाच्या बातम्या...
चार दिवसांनंतर आज सोने स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण
CoronaVirus मुंबईने 'जन्मदात्या' वुहानला मागे टाकले; दिल्ली दुसऱ्या नंबरवर
धक्कादायक! कार्टुन पाहू न दिल्याने १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; पुण्यातील प्रकार
नगरसेवक मुकुंद केणी यांची कोरोनाशी झुंज अपयशी; उपचारावेळी निधन
बहीण-भावाच्या हत्याकांडाने औरंगाबाद हादरले; दीड किलो सोन्याच्या दागिन्यांची लूट
ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढल्या; माजी खासदारावर 25000 कोटींच्या घोटाळ्याचे गुन्हे
आजचे राशीभविष्य - 10 जून 2020; मकर राशीला पदोन्नती मिळण्याचे योग