अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा धोका, रशिया पूर्व चीन समुद्रात सैन्यशक्ती वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:25 PM2020-09-19T13:25:18+5:302020-09-19T13:26:12+5:30

रशिया पॅसिफिक महासागर, पूर्व चीन समुद्र, फिलिपिन्स खाडी या भागात इतरांच्या सैन्य हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. 

russia announces troop build up in eastern area like vladivostok amid us china tension | अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा धोका, रशिया पूर्व चीन समुद्रात सैन्यशक्ती वाढवणार

अमेरिका-चीनमध्ये युद्धाचा धोका, रशिया पूर्व चीन समुद्रात सैन्यशक्ती वाढवणार

Next

अमेरिका आणि चीनमध्ये वाढत्या तणावात आता रशियानंही उडी घेतली आहे.  रशियानेही सैन्याची तैनात वाढवण्याची घोषणा केली आहे. रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगु यांनी गुरुवारी सांगितले की, रशिया सुदूर पूर्वेकडच्या भागात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सैन्य उपस्थिती वाढवित आहे. पूर्व चीन समुद्रातील रशियाचं नौदल व्लादिवोस्तोक येथे सैन्य उपस्थिती आणखी वाढवेल, असा विश्वास आहे. या भागाच्या माध्यमातून रशिया पॅसिफिक महासागर, पूर्व चीन समुद्र, फिलिपिन्स खाडी या भागात इतरांच्या सैन्य हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. 

रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी धोका असलेल्या देशांची नावे घेतली नाहीत
रशियन संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सर्गेई शोईगु म्हणाले की, पूर्व भागात वाढत्या तणावामुळे सैन्य वाढविण्यात येत आहे. मात्र, त्यांनी आपल्या निवेदनात कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही. हे नवीन धोके कोणते आणि सैनिक कुठे तैनात केले जातील हेदेखील त्यांनी स्पष्ट केलेले नाही. तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, चीनला लागणारी सीमारेषा आणि प्रशांत महासागर प्रदेशातील वाढत्या तणावामुळे रशिया चिंताग्रस्त आहे. म्हणूनच तो आपल्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सैनिकांची उपस्थिती वाढवत आहे.

रशियादेखील विवादित प्रदेशात एक पक्ष होणार
मॉस्कोमधील कार्नेगी सेंटरचे विश्लेषक अलेक्झांडर गबिवे म्हणाले की, ज्या प्रदेशात संघर्ष सुरू आहे, त्या प्रदेशात आपल्याकडे पुरेशी लष्करी क्षमता आहे, याची खातरजमा रशियाला करायची आहे. येत्या काही दिवसांत अमेरिका आणि चीन यांच्यात नौदल संघर्ष वाढण्याची  शक्यता आहे. रशिया कधीही निराधार नसेल आणि संपूर्ण प्रकरण हातावर हात ठेवून पाहू शकत नाही. त्याला या भागात आपली हवाई दल, लष्कर आणि नौदलाची संख्याही वाढवावी लागेल.

रशिया एका दगडाने दोन पक्ष्यांना लक्ष्य करणार
पूर्वेकडील भागात सैन्याची तैनाती वाढवून रशिया एका दगडाने दोन पक्षी मारत आहे. एकीकडे तो आपल्या पारंपरिक शत्रू अमेरिकेला थेट संदेश देत आहे, तर दुसरीकडे व्लादिवोस्तोक शहरावरील चीनच्या दाव्यांबाबतही कडकपणा दाखवत आहे. जपानच्या मदतीने अमेरिका या प्रदेशात आपली लष्करी उपस्थिती सातत्याने बळकट करीत आहे. त्यांची युद्धनौका दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व चीन समुद्राभोवती फिरत आहे. अशा परिस्थितीत चीन आणि रशिया दोघेही सावध आहेत.

पुतिनविरोधी चळवळीला चिरडण्याचा हेतू
रशियाच्या पूर्वेकडील भागात दीर्घकाळ अध्यक्ष व्लादिमीर पुतिनविरोधात निषेध सुरू आहे. चिनी सीमेजवळील खबरोव्स्क शहर हे या निषेधाचं केंद्रस्थान आहे. शहरातून स्थानिक राजकीय नेत्याच्या अटकेविरोधात अनेक आठवडे विरोध प्रदर्शन सुरू आहे. अशा परिस्थितीत सैन्याच्या बळावर रशिया विरोधकांनाही चिरडू शकतो.
 

Web Title: russia announces troop build up in eastern area like vladivostok amid us china tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.