नवऱ्याने कुऱ्हाडीने कापले होते पत्नीचे दोन्ही हात, सरकारला द्यावी लागेल ३ कोटीची नुकसान भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 11:30 AM2021-12-18T11:30:01+5:302021-12-18T11:30:23+5:30
Russia Crime News : महिलेच्या निर्दयी पतीने कुऱ्हाडीने तिचे दोन्ही हात कापले होते. नंतर ऑपरेशन करून एक हात जोडण्यात आला होत, पण दुसरा हात डॉक्टर जोडू शकले नव्हते. पतीने महिलेवर कुऱ्हाडीने ४० वार केले होते.
कौटुंबिक हिंसाचाराची शिकार झालेल्या एका महिलेला रशियन (Russia) सरकार आता नुकसान भरपाई देणार आहे. इंटरनॅशनल कोर्टाने रशियाला सांगितलं की पीडित महिलेला ३,७०,००० यूरो म्हणजे तीन कोटी २० लाख रूपये द्यावे. महिलेच्या निर्दयी पतीने कुऱ्हाडीने तिचे दोन्ही हात कापले होते. नंतर ऑपरेशन करून एक हात जोडण्यात आला होत, पण दुसरा हात डॉक्टर जोडू शकले नव्हते. पतीने महिलेवर कुऱ्हाडीने ४० वार केले होते. अशात तिने मोठ्या मुश्कीलीने आपला जीव वाचवला होता.
का केलं पतीने असं?
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, यूरोपियन कोर्ट ऑफ ह्यूमन राइट्स (European Court of Human Rights) ने रशियाला आदेश दिला की, २७ वर्षीय मार्गरीटा ग्रेच्योवा (Margarita Grachyova) सहीत कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार झालेल्या आणखी चार महिलांना नुकसान भरपाई द्यावी. डिसेंबर २०१७ मध्ये मार्गरीटाचा पती दिमित्र ग्रेच्योवने तिच्यावर हल्ला केला होता. त्याने तिच्यावर कुऱ्हाडीने ४० वार केले होते आणि दोन्ही हात कापले होते. पतीला संशय होता की, पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू आहे.
पोलिसांनी केलं होतं दुर्लक्ष
दिमित्री ग्रेच्योवला नंतर कोर्टाने दोषी ठरवत १४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पीडितेने आधी पोलिसांना सांगितलं होतं की, तिचा पती तिला मारहाण करतो. पण त्यावेळी पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. इंटरनॅशनल कोर्टाने हे प्रकरण गंभीरतेने घेत आदेश दिला की, मार्गरीटाला मेडिकल खर्च आणि मानसिक-शारीरिक त्रासासाठी नुकसान भरपाई दिली जावी.
रशियाने आधीही दिला होता नकार
कोर्टाने रशियाला सांगितलं की, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलली जावीत. आधीही अशाप्रकारच्या घटनांमध्ये रशियाने महिलांना नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. रशियन सरकारने सांगितलं होतं की, कौटुंबिक हिंसाचारासाठी सरकारला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही.