रशिया थेट चंद्रावर अणुउर्जा प्रकल्प उभारणार; भारत आणि चीन मदत करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 01:25 PM2024-09-09T13:25:57+5:302024-09-09T13:32:58+5:30

Lunar Nuclear Power Plant : भारताने 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे हा प्लांट भारतासाठी फार महत्वाचा आहे.

Russia Lunar Nuclear Power Plant: Russia will build a nuclear power plant on moon | रशिया थेट चंद्रावर अणुउर्जा प्रकल्प उभारणार; भारत आणि चीन मदत करणार

रशिया थेट चंद्रावर अणुउर्जा प्रकल्प उभारणार; भारत आणि चीन मदत करणार

Lunar Nuclear Power Plant : रशियाने चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी भारतरशियासोबत हातमिळवणी करणार आहे. रशियाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात भारताने उत्सुकता दाखवली आहे. या रशियन प्रकल्पाचा उद्देश चंद्रावर तयार होत असलेल्या बेसला ऊर्जा पुरवठा करणे हा आहे. दरम्यान, चीनही या प्रकल्पात सामील होणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील सरकारी अणुउर्जा संस्था रोसाटॉम या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहे. चंद्रावर बांधण्यात येणारा हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प अर्धा मेगावॅट वीज निर्मिती करेल आणि ही वीज चंद्रावर बांधलेल्या बेससाठी वापरली जाईल.

हा प्लांट 2036 पर्यंत तयार होणार
रशियाची सरकारी न्यूज एजन्सी TASS नुसार, Rosatom चे प्रमुख Alexey Likhachev म्हणाले की, चीन आणि भारताने या प्रकल्पात खूप रस दाखवला आहे. तर, रशियाच्या अंतराळ संस्थेने चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असल्याचे जाहीर केले आहे. 2036 पर्यंत हा प्लांट तयार होण्याची अपेक्षा आहे.

भारतासाठी हा प्लांट महत्वाचा 
रशियाचा चंद्रावर उभारला जाणारा पहिला अणु प्रकल्प भारतासाठी खास आहे. 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याची भारताची योजना आहे. अशा परिस्थितीत हा प्लांट तेथील ऊर्जेची गरज भागवू शकतो. 2021 मध्ये रशिया आणि चीनने संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र बांधण्याची घोषणा केली होती. हे स्टेशन 2035 ते 2045 दरम्यान कधीही सुरू होऊ शकते. या स्थानकाचा उद्देश वैज्ञानिक संशोधन करणे हा आहे. बहुतांश देश याचा वापर करू शकतील. त्याचा फायदा अमेरिकेच्या काही मित्र राष्ट्रांना मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: Russia Lunar Nuclear Power Plant: Russia will build a nuclear power plant on moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.