संरक्षण क्षेत्रात रशिया भारताचा प्रमुख भागीदार
By admin | Published: December 23, 2015 11:55 PM2015-12-23T23:55:54+5:302015-12-23T23:55:54+5:30
रशिया संरक्षण क्षेत्रात यापुढेही भारताचा प्रमुख भागीदार राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या जुन्या मित्राला दिली
मॉस्को : रशिया संरक्षण क्षेत्रात यापुढेही भारताचा प्रमुख भागीदार राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या जुन्या मित्राला दिली. भारत व रशिया ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत भारतात अत्याधुनिक संरक्षण साहित्याचे उत्पादन संयुक्तरीत्या करण्यासाठी सोबत काम करत आहेत, असे ते म्हणाले. मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत.
रशियन वृत्तसंस्था इतर-तासशी बोलताना मोदी म्हणाले, रशिया अनेक दशकांपासून संरक्षण क्षेत्रातील भारताचा प्रमुख भागीदार असून आम्हाला बहुतांश संरक्षण सामग्री तोच पुरवत आला आहे. जागतिक बाजारात भारताची आधीपासूनच चांगला संपर्क असूनही रशिया आमचा मुख्य भागीदार आहे. फारसे देश भारतासोबत नसतानाच्या काळात रशियाने भारताला संरक्षण साहित्य आणि आंतरराष्ट्रीय पाठबळ दिले. भारतीय रशियाच्या या पाठबळाचा कधीही विसर पडू देणार नाहीत. (वृत्तसंस्था)