मॉलमध्ये अचानक उकळत्या पाण्याचा महापूर; 4 जणांचा मृत्यू 70 लोक भाजले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 03:32 PM2023-07-23T15:32:12+5:302023-07-23T15:33:15+5:30
अचानक उकळते पाणी अंगावर आल्यामुळे मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला.
Russia News: जगभरात महापुरासारख्या आपत्तींमुळे हजारो-लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. नदीला पूर येऊन मृत्यू होणे खूप दुःखद घटना आहे, परंतु तुम्ही उकळत्या पाण्याचा (Boiling Water) पूर पाहिला आहे का? अशीच घटना रशियातील मॉस्को येथील एका शॉपिंग मॉलमध्ये घडली आहे.
Russia: Pipes with scolding hot water and steam burst at the Times of the Year elite shopping mall in downtown Moscow, killing at least 4 people and injuring dozens. pic.twitter.com/C7sjXhZwof
— Igor Sushko (@igorsushko) July 22, 2023
मॉलमध्ये अचानक उकळत्या पाण्याचा पूर येऊन, उकळत्या पाण्यातून भाजल्याने 4 जणांचा मृत्यू झाला. या घटनेदरम्यान मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला आणि यात सुमारे 70 जण जखमी झाले. यापैकी 50 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
उकळता पाण्याचा पूर कसा आला?
ही घटना मॉस्को येथील व्रेमेना शॉपिंगमॉलमधील आहे. गरम पाण्याचा पाइप अचानक फुटल्याने हा पूर आला असावा, असा अंदाज आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
A hot water pipe bursts in a shopping mall in Moscow, injuring several people according to local media.
— RT (@RT_com) July 22, 2023
Follow us on Odysee: https://t.co/gMbz1a2E5xpic.twitter.com/xUnCPeLJeO
या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात गरम पाण्याच्या वाफा दिसत आहेत. अनेकांनी हे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण उकळत्या पाण्यामुळे त्यांचेही पाय भाजले.