रशिया-सौदीमुळे कच्चे तेल घसरले
By admin | Published: September 6, 2016 05:21 AM2016-09-06T05:21:28+5:302016-09-06T05:21:28+5:30
रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील बोलणी फिसकटल्यामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात किमती घसरल्या.
सिंगापूर : रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील बोलणी फिसकटल्यामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात किमती घसरल्या. अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिजिएटचा दर 0.७४ टक्क्यांनी अथवा ३३ टक्क्यांनी घसरून ४४.११ डॉलर प्रति बॅरल झाल्या. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 0.८१ टक्क्यांनी अथवा ३८ सेंटांनी घसरून ४६.४५ डॉलर प्रति बॅरल झाल्या.
चीनमध्ये सुरू असलेल्या जी-२0 देशांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि सौदीचे उप युवराज मोहंमद बिन सलेम यांची बैठक झाली. बाजारातील जास्तीचा तेल पुरवठा आणि उपलब्ध साठ्यांमुळे किमती कोसळल्या आहेत. त्यावर उपाय करण्यावर बैठकीत विचारविनिमय झाला, तथापि, बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. (वृत्तसंस्था)