वर्ल्ड कप यजमानपदावरील हक्क रशियाने सोडावा -क्लेग

By admin | Published: July 28, 2014 02:22 AM2014-07-28T02:22:38+5:302014-07-28T02:22:38+5:30

मलेशियाचे विमान पाडण्यात आल्याच्या घटनेनंतर अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आल्याने २०१८ च्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याचा रशियाला हक्कच पोहोचत नाही.

Russia should release the right to host World Cup - CL | वर्ल्ड कप यजमानपदावरील हक्क रशियाने सोडावा -क्लेग

वर्ल्ड कप यजमानपदावरील हक्क रशियाने सोडावा -क्लेग

Next

लंडन : मलेशियाचे विमान पाडण्यात आल्याच्या घटनेनंतर अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आल्याने २०१८ च्या वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याचा रशियाला हक्कच पोहोचत नाही. यजमानपदावरील हक्क सोडावा. रशियाने या स्पर्धेचे आयोजन करावे, हे अनाकलनीय आहे, असे मत व्यक्त करून ब्रिटनचे उपपंतप्रधान निक क्लेग यांनी रशियाच्या यजमानपदाला स्पष्ट विरोध केला आहे.
रशियन समर्थक युक्रेनी बंडखोरांवर मलेशियाचे विमान क्षेपणास्त्राने पाडल्याचा आरोप केला जात आहे; तर दुसरीकडे रशियाचे असे म्हणणे आहे की, हे कृत्य युक्रेनी लष्कराचे असावे. स्पर्धेचे स्थळ बदलण्यास फिफाने नकार दिलेला आहे. जर्मनच्या काही राजकीय नेत्यांनी रशियावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. युरोपियन संघाने निर्बंधाची यादी वाढवत रशियाच्या अनुषंगाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. यजमानपद काढून घेणेच, अत्यंत जबरदस्त आणि प्रतिमात्मक निर्बंध ठरतील. आॅक्टोबरमधील ग्रॅण्ड प्रीक्सचे यजमानपदही रशियाला देऊ नये, असे निक क्लेग यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Russia should release the right to host World Cup - CL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.