चीनशी तणाव, या 'जिगरी' मित्रानं दिली साथ; UNSCच्या स्थायी सदस्यत्वासाठी केलं भारताचं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 07:41 PM2020-06-23T19:41:36+5:302020-06-23T19:43:27+5:30

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी एक उमदा उमेदवार आहे. यामुळे आम्ही भारताच्या उमेदवारीचं समर्थन करतो, असं या मित्रानं म्हटलं आहे.

Russia support India again for unsc permanent membership | चीनशी तणाव, या 'जिगरी' मित्रानं दिली साथ; UNSCच्या स्थायी सदस्यत्वासाठी केलं भारताचं समर्थन

चीनशी तणाव, या 'जिगरी' मित्रानं दिली साथ; UNSCच्या स्थायी सदस्यत्वासाठी केलं भारताचं समर्थन

googlenewsNext
ठळक मुद्देरशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताचे समर्थन केले.भारत आणि चीनला बाहेरून काही मदतीची आश्यकता आहे, असे मला वाटत नाही - लावरोव गेल्या आठवड्यातच भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आठव्यांदा अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

मॉस्को :भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असतानाच रशियाने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिला आहे. सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीचे रशियाने समर्थन केले आहे. 

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताचे समर्थन केले. यापूर्वीही सुरक्षा परिषदेतील भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाने भारताचे समर्थन दिले होते. विशेष म्हणजे, भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणावाचे वातावरण असातानाच, सर्गेई यांचे हे वक्तव्य आले आहे. 

चीनच्या दादागिरीला भारताचं चोख उत्तर, टक्कर देण्यासाठी तयार केलं जबरदस्त 'चक्रव्यूह'

भारत एक प्रबळ उमेदवार - लावरोव
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले, आज आम्ही संयुक्त राष्ट्राच्या संभाव्य सुधारणांवर चर्चा केली. तसेच, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी एक उमदा उमेदवार आहे. यामुळे आम्ही भारताच्या उमेदवारीचे समर्थन करतो. आमचा विश्वास आहे, की भारत सुरक्षा परिषदेचा पूर्ण सदस्य बनू शकतो.

सानिया मिर्झाच्या पतीवर कोरोनाचं संकट! आज येईल रिपोर्ट; ...तरच मिटेल 'लंबी जुदाई'

जेव्हा देशाचा मुद्दा येतो, तेव्हा भारत आणि चीनला बाहेरून काही मदतीची आश्यकता आहे, असे मला वाटत नाही. कारण, ते स्वतःच्या बळावर समस्या सोडवण्यास समर्थ आहेत. असे लावरोव म्हणाले. ते आरआयसीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या बैठकीत बोलत होते. 

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामुळे चीनला झोंबली मिर्ची; ...तर अमेरिका अन् रशियाही कामी येणार नाही, भारताला दिली धमकी

भारत आणि चीन दोघांनीही शांततेसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच त्यांनी संरक्षण अधिकारी आणि परराष्ट्र मंत्री स्तरावरही बैठका सुरू केल्या आहेत. दोन्ही पक्षांपैकी कुणीही, असे वक्तव्य केलेले नाही, ज्यामुळे परिस्थिती बिघडेल. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरदेखील सहभागी झाले होते. काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियानेही भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

सध्या भारत अस्थायी सदस्य - 
गेल्या आठवड्यातच भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आठव्यांदा अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या निवडणुकीत भारताला 192 मतांपैकी 184 मते मिळाली होती.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

Web Title: Russia support India again for unsc permanent membership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.