अवकाशातील उपग्रह नष्ट करणा-या शस्त्राची रशियाकडून चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 05:03 PM2016-12-22T17:03:51+5:302016-12-22T17:06:16+5:30
अमेरिका आणि रशियामध्ये सुरु असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची स्पर्धा अवकाशापर्यंत जाऊन पोहोचली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 22 - अमेरिका आणि रशियामध्ये सुरु असलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची स्पर्धा अवकाशापर्यंत जाऊन पोहोचली आहे. उद्या युद्धाला तोंड फुटलेच तर शत्रू राष्ट्राचे अवकाशातील उपग्रह नष्ट करण्याच्या शस्त्राची रशियाने नुकतीच चाचणी घेतली असे सीएनएन वृत्तवाहिनीने अमेरिकन सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.
रशियाच्या या चाचणीने अवकाशात कुठलाही कचरा निर्माण केला नाही तसेच लक्ष्याचा वेध घेतला नाही असे सूत्रांनी सांगितले. अशी चाचणी करण्याची रशियाची पहिली वेळ नाही. यापूर्वीही रशियाने उपग्रह नष्ट करणा-या शस्त्राची चाचणी करुन आपली क्षमता दाखवून दिली आहे.
लष्करी आणि अन्य व्यावसायिक कामांसाठी अमेरिका मोठया प्रमाणावर उपग्रहांवर अवलंबून आहे. रशियाने अमेरिकन उपग्रहापर्यंत पोहोचणारे कॉसमॉस 2499 तैनात केल्याची अमेरिकेकडे माहिती आहे.