Russia Ukraine Conflict : अमेरिकेचा मोठा दावा; 'या' तारखेला युक्रेनवर हल्ला करणार रशिया, सामन्यासाठी NATO ही तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:19 PM2022-02-14T17:19:04+5:302022-02-14T17:20:16+5:30

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी रविवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी त्यांनी पुतीन यांना युक्रेनविरोधातील लष्करी कारवाई संदर्भात समजावले आणि इशाराही दिला. मात्र, व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की, या 60 मिनिटांच्या संभाषणामुळे परिस्थितीत काही बदल होण्याची चिन्हे नाहीत.

Russia Ukraine Conflict Russian-Ukraine war situation Putin can attack on 16 February America Joe Biden  | Russia Ukraine Conflict : अमेरिकेचा मोठा दावा; 'या' तारखेला युक्रेनवर हल्ला करणार रशिया, सामन्यासाठी NATO ही तयार

Russia Ukraine Conflict : अमेरिकेचा मोठा दावा; 'या' तारखेला युक्रेनवर हल्ला करणार रशिया, सामन्यासाठी NATO ही तयार

googlenewsNext


रशियाने युक्रेनला तीन बाजूंनी घेरले आहे. युक्रेनची राजधानी कीव येथे मॅरेथॉन राजनैतिक आणि लष्करी बैठका सुरू आहेत. अमेरिकन गुप्तचर संस्थांने म्हटल्यानुसार, आता रशियाने युक्रेनच्या सीमेवर 1 लाख 30 हजार सैनिक जमवले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी रविवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी त्यांनी पुतीन यांना युक्रेनविरोधातील लष्करी कारवाई संदर्भात समजावले आणि इशाराही दिला. मात्र, व्हाईट हाऊसचे म्हणणे आहे की, या 60 मिनिटांच्या संभाषणामुळे परिस्थितीत काही बदल होण्याची चिन्हे नाहीत.

रशिया केव्हा करणार हल्ला - 
खुद्द राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि त्यांच्या गुप्तचर संस्था, रशिया युक्रेनवर केव्हा हल्ला करणार?  हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया अत्यंत गुप्तपणे पुढे सरकत आहे. पण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणाही पूर्ण क्षमतेने रशियाची योजना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

रशिया बुधवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला हिट करू शकतो टारगेट - 
गुप्तचर विभागाच्या माहितीवरून अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, रशिया बुधवारी म्हणजेच 16 फेब्रुवारीला आपल्या टारगेटवर हल्ला चढवू शकतो. मात्र, ही माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला अमेरिकी प्रशासनाच्या वतीने माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नव्हता. तसेच ही गुप्त माहिती किती स्पष्ट आहे, हेही अद्याप स्पष्ट नाही. तसेच, आणखी एका रिपोर्टनुसार, रशिया चीनमध्ये 20 फेब्रुवारीला विंटर ओलिम्पिक संपण्यापूर्वी हल्ला करू शकतो.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास मॉस्कोवर कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील आणि NATO कडून प्रत्युत्तर दिले जाईल, असे बायडेन यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि युक्रेनने डिटरेन्स आणि डिप्लोमसीच्या रणनीतीवर सहमती दर्शवली आहे. म्हणजेच रशियाशी राजनैतिक पातळीवरील चर्चा सुरू राहील आणि दोन्ही देश लष्करी तयारीही वाढवतील.

NTAO कडून युक्रेनला मिळतायत शस्त्रास्त्रे -
राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी आपल्या देशातील नागरिकांना कुठल्याही प्रकारची भीती न बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था कमकुवत होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. याच बरोबर, झेलेन्स्की, आपल्या संरक्षण तज्ञांसह, अमेरिका आणि इतर NTAO देशांकडून मिळत असलेली शस्त्रास्त्रेही तैनात करण्यात गुंतलेले आहेत. दरम्यान, झेलेन्स्की आपल्या सूत्रांच्या माध्यमानेही रशियाच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Russia Ukraine Conflict Russian-Ukraine war situation Putin can attack on 16 February America Joe Biden 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.