Russia-Ukraine crisis LIVE: युद्धात युक्रेनच जिंकणार, 'हा' देश म्हणाला आम्ही युक्रेनसोबत
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 01:48 PM2022-02-24T13:48:00+5:302022-02-27T22:32:39+5:30
Russia-Ukrain War Live Updates : रशियाने गुरुवारी युक्रेन विरोधात युद्धाला सुरुवात केली. रशियाच्या हल्ल्यांनंतर यूक्रेनमध्ये हाहाकार माजला आहे. रशियाने ...
Russia-Ukrain War Live Updates : रशियाने गुरुवारी युक्रेन विरोधात युद्धाला सुरुवात केली. रशियाच्या हल्ल्यांनंतर यूक्रेनमध्ये हाहाकार माजला आहे. रशियाने राजधानी कीवला घेरण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. अशा संपूर्ण स्थितीत यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की हतबल झाल्याचे दिसत आहेत, तर अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनीही हात वर केले आहेत. यावर बोलताना झेलेन्स्की यांनी, 'रशियासोबत लढण्यासाठी युक्रेनला एकटे सोडले गेले आहे,' अशा शबद्धात आपली वेदना व्यक्त केली. याच बरोबर, रशियन हल्ल्यांत युक्रेनच्या 137 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 316 जण जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. याच वेळी, युक्रेन रशिया विरोधातील युद्धासाठी सैन्याची जमवाजमवही करत आहे.
LIVE
11:22 PM
भारतातील रशियाचे राजदूत म्हणतात,आमचं पूर्ण समर्थन
विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला के साथ सौहार्दपूर्ण प्रारंभिक बैठक हुई। सामयिक द्विपक्षीय, अंतर्राष्ट्रीय मुद्दों और यूक्रेन में भारतीय छात्रों की सुरक्षा सुनिश्चित करने के तरीकों पर चर्चा की। इसके लिए अपना पूर्ण समर्थन व्यक्त किया: भारत में रूसी राजदूत, डेनिस अलीपोव
— ANI_HindiNews (@AHindinews) February 27, 2022
(फाइल तस्वीर) pic.twitter.com/0tTkH2o2xL
10:31 PM
जार्जिया देश युक्रेनसोबतच, युक्रेनचं जिंकणार
जॉर्जिया यूक्रेन के साथ खड़ा है। अंत में यूक्रेन की जीत होगी। निर्दोष लोगों की हत्या करना मानवता के खिलाफ अपराध है और जिसने भी ऐसा किया वह जवाबदेह होगा। उम्मीद है कि यह युद्ध जल्द ही खत्म हो जाएगा: आर्चिल ज़ुलियाशविली, भारत में जॉर्जिया के राजदूत pic.twitter.com/7J6AG9RKIw
— ANI_HindiNews (@AHindinews) February 27, 2022
10:18 PM
युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक वडोदरात स्वगृही पोहोचले
Gujarat | Indian students evacuated from Ukraine reached Vadodara pic.twitter.com/HnpewaFE88
— ANI (@ANI) February 27, 2022
08:32 PM
कॅनडाचा रशियाला धक्का, घेतला मोठा निर्णय
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे कॅनडाने रशियन विमान चालकांसाठी आपल्या हवाई हद्दीत तात्काळ बंदी लागू केली आहे, अशी माहिती कॅनडाच्या नागरी उड्डाण मंत्र्यांनी दिली आहे.
07:40 PM
खार्किवची रशियाच्या नियंत्रणातून मुक्तता केल्याचा दावा
युक्रेनमधील सर्वात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं शहर असलेल्या खार्किववर रशियन सैन्यानं संपूर्णपणे ताबा मिळवल्याा दावा करण्यात आला होता. पण आता रशियन सैन्याच्या नियंत्रणातून खार्किवची मुक्तता केल्याचा दावा युक्रेननं केला आहे.
07:18 PM
मोदींनी यूपी दौरा अर्धवट सोडला, युक्रेन विषयावरील बैठकीसाठी रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मोदी तातडीनं रवाना झाले आहेत.
06:58 PM
बेलारुसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार, रशियन माध्यमांची माहिती
बेलारुसमध्ये चर्चेसाठी युक्रेननं सहमती दर्शविल्याची माहिती रशियामधील माध्यमांची दिली आहे.
06:54 PM
युक्रेनमधील भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी किती खर्च येतोय?
यूक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारनं मोठी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी एअर इंडियाच्या प्रवासी विमानांचा वापर करण्यात येत असून यासाठी दरतासासाठीचा ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती समोर आली आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर माहिती
03:42 PM
रशियाच्या अडचणीत वाढ?
युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या विरोधात अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी आणि भागीदारांनी बंदी घातलेल्या रशियन बँकांना जागतिक आर्थिक पेमेंट सिस्टम 'स्विफ्ट'(SWIFT) मधून वेगळे करण्याचा आणि रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
02:03 PM
रशियाशी चर्चेसाठी तयार परंतु बेलारूसमध्ये नाही - वोलोडिमिर झेलेन्स्की
#BREAKING Zelensky says ready for talks with Russia, but not in Belarus pic.twitter.com/uew5fSvJJ7
— AFP News Agency (@AFP) February 27, 2022
01:42 PM
रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये केला प्रवेश, लढाई सुरू
#UPDATE
— AFP News Agency (@AFP) February 27, 2022
Russian troops have entered Ukraine's second city Kharkiv and fighting is under way, the head of the regional administration said.
"The Russian enemy's light vehicles broke into the city of Kharkiv... The Ukrainian armed forces are eliminating the enemy," he said.
01:25 PM
रशियाने युक्रेनच्या दक्षिण आणि आग्नेय भागात दोन मोठ्या शहरांना वेढा घातल्याचा केला दावा
Russia claims to have besieged two big cities in south and southeast of Ukraine: AFP News Agency#RussiaUkraineConflict
— ANI (@ANI) February 27, 2022
12:57 PM
युक्रेनने फोटो शेअर करत करुन दिली 9/11 हल्ल्याची आठवण
युक्रेनच्या गृह मंत्रालयाने सोशल मीडियावर अमेरिकेचा 9/11 हल्ला आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेनवरील हल्ल्यांची तुलना करणारे फोटो शेअर केले आहेत. फोटोत अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या (World Trade Centre) ट्विन टॉवर्सवर 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर निघलेला धूर दिसत आहे. तसंच फोटोत कीवमधील रशियन हल्ल्यादरम्यान, क्षेपणास्त्राचा हल्ला (Missile Attack) झाल्यानंतर एक कोसळताना इमारत दिसत आहे. युक्रेनने कीवमधील (Kyiv) इमारतीवरील रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याची तुलना अमेरिकेच्या 9/11 शी केली आहे.
12:46 PM
रशियाने केला हल्ला, युक्रेनने केली अमेरिकेतील 9/11 हल्ल्याशी तुलना
Russian Ukraine War : रशियाने केला हल्ला, युक्रेनने केली अमेरिकेतील 9/11 हल्ल्याशी तुलना, फोटो शेअर करत म्हणाला....#RussiaUkraineConflict#RussiaUkraineWarhttps://t.co/ioizdGQhpe
— Lokmat (@lokmat) February 27, 2022
12:36 PM
"मुलं शिक्षणासाठी बाहेर जाऊ नये, यासाठी प्रायव्हेट सेक्टरने पुढाकार घ्यावा"
वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय मुलं जगभरात जातात. तिथं भाषेची अडचण आहे. तरीही ते जातात. त्यामुळे देशातील पैसा देखील भारताबाहेर जातो. मुलं शिक्षणासाठी बाहेर जाऊ नये, यासाठी प्रायव्हेट सेक्टरने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारने योजना राबवाव्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12:28 PM
"वैद्यकीय शिक्षणासाठी मुलं देशाबाहेर जात असल्याने पैसाही देशाबाहेर जातोय"
आज हमारे बच्चे मेडिकल एजुकेशन के लिए बाहर जा रहे हैं, वहां Language Problem होने के बावजूद जा रहे हैं। इसे देखते हुए प्राइवेट सेक्टर के साथियों के साथ ही राज्य सरकारों से मेरी एक अपील है… pic.twitter.com/4JQg2Efdit
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2022
12:00 PM
युक्रेनमधून 250 भारतीयांना घेऊन विमान परतले
Scindia welcomes 250 Indians evacuated from Ukraine, says PM Modi in touch with Ukrainian President
— ANI Digital (@ani_digital) February 26, 2022
Read @ANI Story | https://t.co/0EKa4WMEOH#IndiansInUkraine#UkraineRussiaWar#RussiaUkrainepic.twitter.com/WkZWTTyOT4
11:45 AM
240 भारतीयांसह तिसरे विमान हंगेरीहून दिल्लीसाठी रवाना
Ukraine crisis: Third flight with 240 Indian nationals takes off from Hungary for Delhi
— ANI Digital (@ani_digital) February 26, 2022
Read @ANI Story | https://t.co/OTqifbnsKp#RussiaUkraine#IndiansInUkraine#UkraineRussiaConflict#UkraineCrisispic.twitter.com/q6UEwRnnT9
11:39 AM
युक्रेनिनन मेजर जनरल बोरिस क्रेमेनेत्स्की यांचा दावा
आम्ही 200 रशियन सैनिकांना पकडले आहे, त्यापैकी काही फक्त 19 वर्षांचे आहेत. आम्ही त्यांच्या पालकांना याबद्दल फोन करून सांगितलं असता त्यांना धक्का बसला - युक्रेनिनन मेजर जनरल बोरिस क्रेमेनेत्स्की
11:20 AM
"आम्ही 200 रशियन सैनिकांना पकडले आहे"
"We have captured around 200 Russian soldiers, some around 19 years old. Not trained at all. Badly equipped." Ukraninan Major General Borys Kremenetsky says. "We allow them to call their parents. Parents completely surprised."
— Elizabeth Campbell (@ECampbell360) February 26, 2022
10:49 AM
रशियन सैन्याने सर्व बाजूंनी युक्रेनची राजधानी किव्हकडे येण्यास केली सुरुवात - रॉयटर्स
10:47 AM
रविवारी पहाटे वासिल्किवमध्ये राजधानीच्या दक्षिणेला दोन मोठे स्फोट ऐकू आले - रॉयटर्स
11:41 PM
सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांसोबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची युक्रेन प्रश्नी बैठक
Russian President Vladimir Putin chairs a meeting with permanent members of the Security Council on Ukraine, an official statement reads pic.twitter.com/KL7weUnxRf
— ANI (@ANI) February 25, 2022
11:16 PM
मिशन एअरलिफ्ट: एअर इंडियाची दोन विमानं उद्या उड्डाण करणार
Based upon inputs from MEA on the emerging situation in Ukraine, Air India will operate 2 flights from Delhi to Bucharest (Romania) and Budapest (Hungary) tomorrow February 26: Air India pic.twitter.com/wezkiL1Ovb
— ANI (@ANI) February 25, 2022
09:59 PM
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केला पुतिन यांना फोन; वाटाघाटी करण्याचं केलं आवाहन
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना फोन केला आहे. युक्रेनशी वाटाघाटी करण्याचं आवाहन जिनपिंग यांनी पुतिन यांना केलं आहे.
President of China, Xi Jinping speaks to Russian President Vladimir Putin, calls for 'negotiation' with Ukraine- state media: AFP
— ANI (@ANI) February 25, 2022
(file photos) pic.twitter.com/nbalbdFcMh
09:40 PM
सत्ता तुमच्या हातात घ्या; युक्रेनच्या लष्कराला पुतिन यांनी केलं आवाहन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनच्या सैन्याला सत्ता आपल्या हातात घेण्याचं आवाहन केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.
Russian President Vladimir Putin to Ukrainian military- "Take power into your own hands": Reuters pic.twitter.com/JYdqmNTm4t
— ANI (@ANI) February 25, 2022
09:10 PM
पुतीन यांची सुरक्षा परिषदेसोबत बैठक
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशाच्या सुरक्षा परिषदेसोबत बैठक घेतली असून या बैठकीत युक्रेनला अण्वस्त्र बनवण्यास मज्जाव घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
09:05 PM
रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारुस येथे चर्चा होण्याची शक्यता
रशियानं युक्रेनसोबत चर्चेची दाखवल्यानंतर दोघांमध्ये नेमकी कुठे चर्चा होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांमध्ये बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे चर्चा होणार असल्याचं बोललं जातं आहे.
07:19 PM
मोठी बातमी! युक्रेनची राजधानी पडली
रशियाच्या सैन्याने कीवच्या रस्त्यावर ताबा मिळविला आहे. रशियाच्या चिलखती गाड्या कीवच्या रस्त्यांवर दिसू लागल्य़ा आहेत. यामुळे कीव हरल्यात जमा आहे. आता पुढील दिशा चर्चेअंती स्पष्ट होणार आहे.
07:19 PM
पुतीन यांच्या विरोधात युरोपियन युनिअनचा मोठा निर्णय
युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांच्याशी जोडलेली युरोपीय संपत्ती गोठवण्यास युरोपियन युनियनने सहमती दर्शवली आहे.
European Union agrees to freeze European assets linked to Russian President Vladimir Putin and Foreign Minister Lavrov over Ukraine invasion, reports AFP
— ANI (@ANI) February 25, 2022
06:51 PM
युक्रेन विरुद्धच्या युद्धानंतर रशियानं मित्र भारताबाबत केलं मोठं विधान!
रशिया आणि युक्रेनमधील युद्धातभारताची भूमिका फार महत्वाची मानली जात आहे. रशियानं भारताबाबत काय म्हटलं हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा आणि वाचा
05:37 PM
रशिया-युक्रेन युद्धात 20 हजार भारतीय अडकले; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय
रशियन सैन्य राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहे. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सैन्य बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे.
05:02 PM
रशियाला युक्रेनसोबत चर्चेला तयार, पण...
युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी रशियानं युक्रेनला चर्चेची ऑफर दिली आहे. पण त्याआधी युक्रेननं त्यांची सैन्य कारवाई थांबवावी अशी अट रशियानं ठेवली आहे.
03:40 PM
रशियन रणगाड्यासमोर उभे राहिले युक्रेनचे सैनिक
रशियन रणगाड्यासमोर युक्रेनचे १३ सैनिक उभे राहिले. जीव गमावला पण मागे हटले नाहीत. युक्रेन नागरिकांनी केलं सॅल्यूट
02:52 PM
युक्रेनला मिळाली हॅकर्सची मदत, रशियावर मोठा सायबर हल्ला
हॅकर्सच्या एका Anonymous गटाने रशियाविरुद्धच सायबर युद्ध सुरू केले आहे. महत्वाचे म्हणजे, रशियन सरकारच्या अनेक वेबसाइट्सना निशाणा करत, त्या बंद केल्याचा दावाही करण्यात आला आहे. याच बरोबर, रशियाने युक्रेनवर सैन्य कारवाई केल्याने, आपण रशियाच्या डझनावर वेबसाइट्सना निशाणा बनवून त्या डाऊन केल्याचा दावाही करण्यात आला आहे.
12:41 PM
युक्रेनच्या राजधानी कीवमध्ये रशियन सैन्य शिरलं
युक्रेनच्या सैन्याने कीव नजिकचा एक पूल उडून दिला आहे. रशियन सैन्याला रोखण्यासाठी हा पूल उडवण्यात आला. मात्र, रशियाचे काही सैन्य यापूर्वीच कीवमध्ये शिरले आहे. यासंदर्भात स्वतः युक्रेनच्या राष्ट्रपतींनी माहिती दिली.
12:32 PM
युक्रेनच्या सैन्याने शुक्रवारी पहाटे कीववर शत्रूचे विमान पाडले
युक्रेनच्या सैन्याने शुक्रवारी पहाटे कीववर शत्रूचे (रशिया) विमान पाडले, यानंतर हे विमान एका निवासी इमारतीवर कोसळले आणि त्याला आग लागली.
Ukrainian forces downed an enemy aircraft over Kyiv in the early hours on Friday, which then crashed into a residential building and set it on fire: Reuters
— ANI (@ANI) February 25, 2022
Visuals from Kyiv, Ukraine.
(Visuals - Reuters)#RussiaUkraineConflictpic.twitter.com/PbC6qr62qb
11:43 AM
रशियाचे 30 टँक उद्धवस्त, 7 एयरक्राफ्ट, 6 हेलिकॉप्टर पाडले, 25 सैनिक सरेंडर; युक्रेनचा दावा
युक्रेनच्या लष्कराचे कमांडर-इन-चीफ, व्हॅलेरी जालुझनी यांनी, आपण 30 रशियन टँक नष्ट केल्याचा, 7 विमाने आणि 6 हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही, तर 25 रशियन सैनिकांनी युक्रेनच्या सैन्यापुढे शरणागती पत्करल्याचेही जालुझनी यांनी म्हटले आहे.
11:18 AM
युक्रेनमध्ये सक्तीची सैन्य भरती करण्याचा राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांचा आदेश
यूक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की यांनी देशातील आपत्कालीन स्थितीमुळे सक्तीची सैन्य भरती करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे १८ ते ६० वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. ६० हजार सैन्य देशाच्या रक्षणासाठी तैनात असल्याचे यूक्रेनने म्हटले आहे.
09:22 AM
पुतिन यांच्याविरोधात रशियातच ठिकठिकाणी आंदोलन, राजधानीसह 53 शहरांत लोक रस्त्यावर
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा खुद्द रशियातच विरोध होताना दिसत आहे. या हल्ल्याविरोधात रशियाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये लोक आंदोलन करत आहेत. राजधानीसह 53 शहरांत लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलन करणाऱ्या 1700 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
07:50 AM
पहिल्या दिवसाच्या युद्धात 137 जणांचा मृत्यू - झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हवाल्याने एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या पहिल्या दिवसाच्या युद्धात आतापर्यंत 137 जणांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नाही, तर रशियाशी लढण्यासाठी युक्रेनला 'एकटे सोडले', असेही राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
President Zelensky says Ukraine 'left alone' to fight Russia: AFP
— ANI (@ANI) February 25, 2022
11:48 PM
पुतीन यांचे हात युक्रेनी जनतेच्या रक्तानं माखलेले- ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन
Russian President Putin will never be able to cleanse the blood of Ukraine from his hands: British Prime Minister Boris Johnson in a statement on Ukraine in Parliament pic.twitter.com/TeJLjOrj37
— ANI (@ANI) February 24, 2022
11:27 PM
रशियन बँकांना लंडनच्या आर्थिक व्यवस्थेतून वगळणार; ब्रिटनचा मोठा निर्णय
Russian banks would be excluded from London's financial system as part of further sanctions: British Prime Minister Boris Johnson in a statement on Ukraine in Parliament
— ANI (@ANI) February 24, 2022
(Reuters) pic.twitter.com/0AHWrfk6Xj
11:24 PM
रशियन सैन्यानं घेतला चेर्नोबेल अणु ऊर्जा प्रकल्पाचा ताबा
The Chernobyl nuclear power plant has been captured by Russian forces, reports Reuters quoting an adviser to the Ukrainian presidential office, Mykhailo Podolyak
— ANI (@ANI) February 24, 2022
10:50 PM
रशिया आणि नाटोमधील वाद, मतभेद प्रामाणिक संवादातूनच सोडवले जाऊ शकतात; पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना दिला चर्चा करण्याचा सल्ला
PM Narendra Modi speaks to Russian President Vladimir Putin
— ANI (@ANI) February 24, 2022
Pres Putin briefed PM about the recent developments regarding Ukraine. PM reiterated his long-standing conviction that the differences between Russia & NATO can only be resolved through honest and sincere dialogue: PMO
10:33 PM
UNSCमध्ये भारताचं लक्ष नेहमीच तणाव कमी करण्यावर- परराष्ट्र सचिन हर्ष व्ही. श्रृंगला
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताचं लक्ष नेहमीच तणाव कमी करण्यावर असतं, असं भारतीय परराष्ट्र सचिन हर्ष व्ही. श्रृंगला यांनी सांगितलं.
Our focus in the UNSC is always been on de-escalation of tensions, diplomatic dialogue and emphasised on the existing agreements like the Minsk agreements, the Normandy format: Foreign Secretary Harsh V Shirngla
— ANI (@ANI) February 24, 2022
10:28 PM
ब्रिटन रशियावर निर्बंध लादणार; गॅस अन् तेलासाठी रशियावर अवलंबून न राहण्याचा निर्णय
ब्रिटन रशियावर निर्बंध लादणार; गॅस अन् तेलासाठी रशियावर अवलंबून न राहण्याचा निर्णय
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशिया-युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. 'रशियावर काही आर्थिक निर्बंध लादण्याच्या निर्णयावर आम्ही आमच्या काही मित्र राष्ट्रांशी सहमत आहोत. त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्थाही डळमळीत होईल. तसंच आम्ही गॅस आणि तेलासाठी रशियावर अवलंबून न राहण्याचा निर्णय घेतलाय' असं बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.
10:16 PM
रशियातील निर्बंधांबद्दल चर्चा करण्यासाठी व्लादिमिर पुतीन यांनी बोलावली बैठक
रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांबद्दल चर्चा करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी बैठक बोलावली आहे.
Russian President Vladimir Putin hosts business summit to discuss sanctions in Moscow
— ANI (@ANI) February 24, 2022
(Source: Reuters) pic.twitter.com/SyL1uor31I
10:14 PM
भारताचे परराष्ट्र मंत्री युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोलणार- परराष्ट्र सचिव हर्ष व्ही. श्रृंगला
भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आज युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष व्ही. श्रृंगला यांनी दिली आहे.
External Affairs Minister Dr S Jaishankar is expected to speak to the Ukrainian Foreign Minister today: Foreign Secy Harsh V Shringla pic.twitter.com/Rqaxcer937
— ANI (@ANI) February 24, 2022
10:05 PM
पंतप्रधान मोदी लवकरच पुतिन यांच्याशी बोलणार- भारताचे परराष्ट्र सचिव
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी बोलणार आहेत, अशी माहिती देशाचे परराष्ट्र सचिवांनी दिली आहे.
The Prime Minister is scheduled to speak to Russian President Vladimir Putin shortly: Foreign Secretary Harsh V Shringla pic.twitter.com/IEfgyT5BeE
— ANI (@ANI) February 24, 2022
09:34 PM
रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाची, क्रेमलिनची वेबसाईट झाली ठप्प; सायबर हल्ल्याची शक्यता
रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाची, क्रेमलिनची वेबसाईट झाली ठप्प; सायबर हल्ल्याची शक्यता
09:21 PM
युक्रेनची राजधानी कीवमध्ये कर्फ्यू जारी: महापौरांची घोषणा- रिपोर्ट
Ukraine capital Kyiv declares curfew-mayor, reports new agency AFP
— ANI (@ANI) February 24, 2022
09:05 PM
युक्रेनच्या अणुउर्जा प्रकल्पावर रशिया ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात; युक्रेनचा दावा
युक्रेनच्या अणुउर्जा प्रकल्पावर रशिया ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात; चेर्नोबिल आण्विक अपघातासारखा प्रकार होण्याची शक्यता. युक्रेनचा दावा
09:01 PM
भारतीय दुतावासाने युक्रेनच्या सरकारला भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा करण्यासाठी पत्र लिहिले.
भारतीय दुतावासाने युक्रेनच्या सरकारला भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा करण्यासाठी पत्र लिहिले.
Embassy of India, Kyiv writes to the Government of Ukraine for the safety & security of Indian students in the country pic.twitter.com/5cuONaqhvC
— ANI (@ANI) February 24, 2022
08:54 PM
त्याग नडला! युक्रेनकडे जगातील तिसऱ्या क्रमांकाची अण्वस्त्रे होती, आज रशियाची हिम्मतही झाली नसती
एक काळ असा होता, अमेरिका, रशियानंतर युक्रेनकडे जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे होती. पण प्रसंगच असा आला की....आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
Ukraine Russia War: युक्रेनला तो त्याग नडला! नाहीतर आज रशियाची हिम्मतही झाली नसती; लुळापांगळा बनला
08:45 PM
परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेणार
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालय आज रात्री ९:१५ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. तत्पूर्वी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनमधील परिस्थितीवर सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.
08:35 PM
15 भारतीय विद्यार्थ्यांना इमारतीच्या तळघरात हलवण्यात आले
युक्रेनच्या वैद्यकीय विद्यापीठात अडकलेल्या बेळगाव येथील दोघांसह जवळपास 15 भारतीय विद्यार्थ्यांना संभाव्य हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी वसतिगृहाच्या इमारतीच्या तळघरात हलवण्यात आले आहे. हे विद्यापीठ रशियाच्या सीमेपासून 76 किमी अंतरावर आहे.
08:23 PM
पुतिन यांच्याशी पंतप्रधान मोदी नरेंद्र चर्चा करण्याची शक्यता
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत या बैठकीला देखील सुरुवात झाली आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनंही याबाबतचे ट्विट केले आहे.
#WATCH Prime Minister Narendra Modi chairs meeting of the Cabinet Committee on Security (CCS) pic.twitter.com/9lvHMRi1bT
— ANI (@ANI) February 24, 2022
08:18 PM
युक्रेनमधील 70 हून अधिक लष्करी आस्थापने उद्ध्वस्त
युक्रेनमधील 11 विमानतळांसह 70 हून अधिक लष्करी आस्थापने उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे.
08:11 PM
भारतीय दुतावासात 200 भारतीय विद्यार्थी
युक्रेनच्या कीवमधील भारतीय दुतावासात 200 भारतीय विद्यार्थ्यांनी आश्रय घेतला.
Ambassador's Interaction with Indian Students in Kyiv.@MEAIndia@PIB_India@PIBHindi@DDNewslive@DDNewsHindi@DDNational@PMOIndia@IndianDiplomacypic.twitter.com/jrfXPlzPKY
— India in Ukraine (@IndiainUkraine) February 24, 2022
08:01 PM
व्लादिमीर पुतिन यांचा रशियन नागरिकांना इशारा
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून नागरिकांना इशारा देण्यात आला आहे. ज्यामध्ये नागरिकांना देशातील युद्धविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी होण्याविरुद्ध चेतावणी दिली आहे. रशियाने अशा कारवायांमध्ये सहभागी होण्यापासून नागरिकांना थेट इशारा दिला आहे.
07:41 PM
रशियाची 6 विमाने आणि 2 हेलिकॉप्टर पाडले, युक्रेनचा दावा
युक्रेनच्या बाजूनेही अनेक दावे केले जात आहेत. ज्यामध्ये युक्रेनने रशियाची 6 विमाने आणि 2 हेलिकॉप्टर पाडल्याचे म्हटले आहे.
07:36 PM
युक्रेनमध्ये एटीएमच्या बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा
युक्रेनच्या कीव शहरातील एटीएमच्या बाहेरही लांबच लांब रांगा दिसत होत्या, कारण हे युद्ध किती काळ चालेल हे माहित नाही. त्यामुळे लोक आधीच तयारी करत आहेत आणि आपल्याकडे रोख रक्कम ठेवत आहेत. जेणेकरून भविष्यात परिस्थिती आणखी बिघडली तर लोकांना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
07:33 PM
अहमदनगरमधील 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
महाराष्ट्रातील अहमदनगरमधील 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. हे सर्व विद्यार्थी विद्यापीठात सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
अहमदनगरमधील १८ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; सर्व विद्यार्थी विद्यापीठात सुरक्षित https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@lokmat) February 24, 2022
07:27 PM
रशियाकडून 203 हल्ले
रशियाने गुरुवारी 203 हल्ले केल्याचे युक्रेन पोलिसांनी सांगितले.
07:24 PM
Elon Musk यांना मोठा धक्का! 200 बिलियन डॉलर पेक्षा कमी झाली संपत्ती
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा जगभरातील शेअर बाजारात परिणाम झाला. सलग चौथ्या दिवशी टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे टेस्लाचा शेअर (Tesla Stock) सप्टेंबरनंतरच्या नीचांकी पातळीवर गेला. त्यामुळे जगातील श्रीमंत व्यक्ती Elon Musk यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची संपत्ती 200 बिलियन डॉलर पेक्षा कमी झाली आहे.
सलग चौथ्या दिवशी टेस्लाच्या शेअर्समध्ये घसरण झाली. त्यामुळे टेस्लाचा शेअर सप्टेंबरनंतरच्या नीचांकी पातळीवर गेला. #ElonMusk #RussiaUkraineConflict https://t.co/ynsRnD9iNF
— Lokmat (@lokmat) February 24, 2022
07:09 PM
तर किमान आम्ही प्रयत्न केला पाहिजे - शशी थरूर
जर चिनी भारतात देशात घुसले तर इतर देशांनी आपल्या बाजूने उभे राहावे अशी आमची इच्छा आहे. जर युक्रेनची अपेक्षा असेल की आम्ही रशियाशी बोलणे आवश्यक आहे, तर किमान आम्ही प्रयत्न केला पाहिजे. तसेच, या समस्येच्या योग्य बाजूने उभे राहिले पाहिजे, असे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे.
If the Chinese march into our country we would want other countries to stand up for us. If Ukraine expects us to speak to Russians, then atleast we should try and be counted on the right side of the issue: Congress Lok Sabha MP Shashi Tharoor#UkraineRussiaCrisispic.twitter.com/QXt1ESopFH
— ANI (@ANI) February 24, 2022
06:48 PM
युक्रेनचे लष्करी विमान कीवजवळ कोसळले
युक्रेनची राजधानी कीवजवळ युक्रेनचे लष्करी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. या विमानात 14 जण होते असे सांगण्यात येत आहे.
Ukraine military plane with 14 aboard crashes near Kyiv: AFP News Agency #RussiaUkraineConflict
— ANI (@ANI) February 24, 2022
06:10 PM
रशियाचे दोन सैनिक ताब्यात असल्याचा युक्रेनचा दावा
युक्रेनने दोन रशियन सैनिकांना पकडल्याचा दावा केला आहे. युक्रेनने या दाव्यासंदर्भात एक फोटोही शेअर केला आहे. या दोन रशियाच्या सैनिकांना ओलीस ठेवण्यात आले आहे.
06:03 PM
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष स्वतः सैन्यासोबत युद्धभूमीवर उतरल्याचे वृत्त आहे.
06:03 PM
निर्मला सीतारामन घेणार नरेंद्र मोदींची भेट
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन संघर्षाच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.
05:53 PM
रशियन सैन्य कीवमध्ये घुसले, 30 हून अधिक हवाई हल्ले
रशियन सैन्य कीवमध्ये घुसले असून युक्रेनच्या 30 हून अधिक नागरी आणि लष्करी आस्थापनांवर हल्ले केले आहेत.
Ukraine's military says Russia attacked Ukraine with more than 30 strikes on civilian and military infrastructure, including with Kalibr cruise missiles: Reuters
— ANI (@ANI) February 24, 2022
05:47 PM
100 हून अधिक लढाऊ विमाने हाय अलर्टवर
नाटोमधून मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाटोचे म्हणणे आहे की 100 हून अधिक लढाऊ विमाने हाय अलर्टवर आहेत. याशिवाय 120 युद्धनौकाही तैनात आहेत. जे आवश्यक असेल ते आम्ही करू, असे नाटोचे म्हणणे आहे.
05:47 PM
रशियन सैन्याचा ओडेसा शहरात प्रवेश
युक्रेनच्या ओडेसा शहरात रशियन सैन्याने प्रवेश केल्याची बातमी आहे. रशियाने ओडेसाच्या किनाऱ्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
05:35 PM
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
#WATCH Our government is taking all measures to bring back our citizens including students. India wants peace to prevail and no situation promoting a war should arise: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/KOlQ5t9bdt
— ANI (@ANI) February 24, 2022
05:21 PM
रशियन सैन्याचे हल्ले सुरूच
रशियन सैन्याचा युक्रेनवर हल्ला; घाबरलेल्या युक्रेनी नागरिकांनी घेतला मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय
05:20 PM
भारत काय भूमिका घेणार?
दिल्लीत घडामोडींना वेग; पंतप्रधान मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; युक्रेननं मागितलेल्या मदतीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार
04:23 PM
युक्रेनमधील भारताच्या राजदूतांचा संदेश
माझी सर्वांना शांत राहण्याची आणि धैर्याने परिस्थितीचा सामना करण्याची विनंती आहे, असे युक्रेनमधील भारताच्या राजदूतांनी म्हटले आहे.
04:19 PM
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, पाच मिनिटांत कीवमध्ये 4 स्फोट
रशियन सैन्याने युक्रेनवर कारवाई तीव्र केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कीवमध्ये पाच मिनिटांत चार मोठे स्फोट झाले आहेत.
Smoke rises from the territory of the Ukrainian Defence Ministry's unit, after Russian President Vladimir Putin authorized a military operation in eastern Ukraine, in Kyiv, reports Reuters
— ANI (@ANI) February 24, 2022
(Photo source: Reuters) pic.twitter.com/55t2Ls9hOt
04:12 PM
उद्धव ठाकरेंकडून सचिवांना परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या आहेत.
#युक्रेन मधील #युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक विशेषत: विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांची तिथे काय व्यवस्था आहे तसेच त्यांना परत सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधण्याच्या सूचना मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. pic.twitter.com/DqKc1DEQ21
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 24, 2022
04:00 PM
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे 40 सैनिक ठार
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या 40 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दहा नागरिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष बोरिस जॉन्सन यांनी या प्रकरणी चिंता व्यक्त केली असून जी-7 रशियाच्या हल्ल्याबाबत बोलणार असल्याचे सांगितले आहे.
03:48 PM
सेन्सेक्स 2,700 अंकांनी घसरला
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचे आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थकारणावर परिणाम होणार आहेत. भारताच्या शेअर बाजारावरही याचा परिणाम झाला आहे. सेन्सेक्स 2700 अंकांपेक्षा अधिक घसरला आहे. दुसरीकडे, निफ्टीही 16,400 पर्यंत घसरला आहे.
Sensex crashes 2702 points to close at 54,529; Nifty ends at 16,247.
— ANI (@ANI) February 24, 2022
03:44 PM
रशियाच्या हल्ल्यानंतर पार्श्वभूमीवर युक्रेनची भारताकडे धाव
युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. दरम्यान, युक्रेन या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी जगभरातील मोठ्या देशांना सातत्याने विनंती करत आहे. आता युक्रेनच्या वतीने भारताच्या पंतप्रधानांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. युक्रेनच्या भारतातील राजदूताने याप्रकरणी पंतप्रधान मोदींकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोल्खा यांनी म्हटले आहे.
03:28 PM
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, 'हम झुकेंगे नहीं'
युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, आम्ही रशिया समोर आत्मसमर्पण करणार नाही. रशिया समोर झुकणार नाही. तसेच, युक्रेनच्या रक्षा मंत्रालयाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आम्ही सहा रशियन विमाने पाडली आहेत. याशिवाय 50 रशियन सैनिक मारले गेले असून 2 रणगाडेही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
03:22 PM
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे शियन नागरिकांना आवाहन
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियन नागरिकांना युद्धाचा निषेध करण्यासाठी बाहेर येण्याचे आवाहन केले आहे.
03:01 PM
कीवमधील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विशेष उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. दूतावासाच्या वेबसाइटवर, सोशल मीडियावरील पोस्ट आणि खालील क्रमांकावर संपर्क साधा.
03:01 PM
रशियाच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी मेट्रो स्टेशन बनले शेल्टर
युक्रेनमध्ये दुकाने, बार, मेट्रो स्टेशन, अंडरपास, कोल्ड वॉर न्यूक्लियर शेल्टर आणि स्ट्रिप क्लबचे रूपांतर शेल्टर होममध्ये करण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी नागरिकांना भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये शेल्टर घेण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये पूर्व युरोपमधील सर्वात मोठे आणि सर्वात जुने भूमिगत नेटवर्क आहे.
02:51 PM
केरळच्या मुख्यमंत्र्यांचे एस जयशंकर यांना पत्र
युक्रेनमध्ये असलेल्या केरळमधील 2320 विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.
02:30 PM
50 रशियन सैनिक ठार, 6 विमाने पाडली; युक्रेनचा मोठा दावा
युक्रेनच्या लष्कराने युद्धादरम्यान मोठा दावा केला आहे. युक्रेनमधील Shchastya शहर सध्या युक्रेनच्याच ताब्यात आहे. त्यांनी तिथे 50 रशियन सैनिकांना ठार केल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, सहा विमानेही खाली पाडण्यात आली आहे. यापूर्वी पाच विमाने आणि हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला होता.
Ukraine says killed 'around 50 Russian occupiers': AFP
— ANI (@ANI) February 24, 2022
02:11 PM
युरोपियन संघ रशियावर कठोर निर्बंध लादणार
युरोपियन संघाने रशियावर निर्बंधांचे सर्वात मजबूत, कठोर पॅकेज लादण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनमध्ये आज झालेल्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ रशियावरील ही कारवाई होणार आहे.
Despite President Joe Biden's efforts to head off a Russian attack against Ukraine, President Vladimir Putin was undeterred. How Biden handles the crisis is expected to have profound implications for his political fortunes and U.S. relations with the world https://t.co/TGxPYW6OO0pic.twitter.com/Zy7xVzXEsW
— Reuters (@Reuters) February 24, 2022
02:08 PM
युक्रेनच्या राजधानीत गोंधळ
रशियन हल्ल्यानंतर युक्रेनच्या लोकांमध्ये राजधानी कीव सोडण्यासाठी गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे, कीवचे रस्ते मोठ्या प्रमाणात जाम झाले आहेत. दरम्यान, युक्रेनच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरने आपण रोख रकमेची मर्यादा ठरवत असल्याचे सांगितले आहे. यानंतर लोक त्यांच्या खात्यातून एका दिवसात फक्त 100,000 Ukrainian hryvnia काढू शकतील.
01:53 PM
युक्रेनमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
01:52 PM
युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू
रशियाने कारवाई केल्यानंतर युक्रेनने मार्शल लॉ लागू केला आहे. मार्शल लॉमध्ये गोष्टी थेट लष्करी नियंत्रणाखाली जातात.
01:51 PM
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी
केंद्र सरकारने युक्रेनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. यासोबतच तिथे अडकलेले नागरिक दिलेल्या वेबसाइटवर मदत मागू शकतात.
01:50 PM
अमेरिकन नागरिकांसाठी सुरक्षा सतर्कतेची घोषणा
रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनमध्ये 'लष्करी कारवाई' घोषित केल्यानंतर अमेरिकन दूतावासाने युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांसाठी सुरक्षा सतर्कतेची घोषणा केली. "युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांना त्या ठिकाणी आश्रय घेण्याचा आणि आवश्यक कारवाई करण्याचा सल्ला देण्यात आला आहे."
US embassy announces security alert for US nationals in #Ukraine following Russian President Putin declaring 'military operation' there. "US citizens in Ukraine are advised to shelter in place and take necessary action." pic.twitter.com/xoO4KKMxV7
— ANI (@ANI) February 24, 2022
01:49 PM
युक्रेनमध्ये रणगाडे घुसले, विमानतळावरही हल्ला
क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर युक्रेनच्या मारियुपोल शहरात रणगाडे दिसले आहेत. याशिवाय. विमानतळाजवळील लष्कराच्या जागेतून धूर निघताना दिसत आहे. इतर शहरांतील विमानतळांवरही हल्ले झाले आहेत.
Smoke fumes out of a military installation near the airport, tanks move into the city, after Russian President Vladimir Putin authorized a military operation in eastern Ukraine, in Mariupol: Reuters pic.twitter.com/UH42Rl05Er
— ANI (@ANI) February 24, 2022