तुम्हाला उद्ध्वस्त करायला १० सेकंद पुरेशी; जगातील सर्वात तरुण पंतप्रधानांना रशियाकडून धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 05:16 PM2022-05-14T17:16:40+5:302022-05-14T17:18:38+5:30

आमच्या अस्तित्वाला नख लावण्याचा प्रयत्न केल्यास तुमची राख करू; रशियाची थेट धमकी

Russia Warns Finland And Britain For Nuclear Attack With Sarmat Satan 2 Missile | तुम्हाला उद्ध्वस्त करायला १० सेकंद पुरेशी; जगातील सर्वात तरुण पंतप्रधानांना रशियाकडून धमकी

तुम्हाला उद्ध्वस्त करायला १० सेकंद पुरेशी; जगातील सर्वात तरुण पंतप्रधानांना रशियाकडून धमकी

Next

मॉस्को: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या एका वरिष्ठ निकटवर्तीयानं ब्रिटनला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. सरमत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्यास ते अवघ्या २०० सेकंदांत ब्रिटनपर्यंत पोहोचेल, असं ड्युमाच्या संरक्षण समितीचे उपाध्यक्ष असलेल्या ऍलेक्सी जुरावलेव यांनी म्हटलं आहे. 

रशियाचा शेजारी असलेला फिनलँड सध्या नाटोचा सदस्य होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी नाटोमध्ये सहभागी होऊ नये यासाठीही रशिया दबावतंत्राचा वापर करत आहे. फिनलँडला साफ करण्यासाठी आम्हाला फक्त १० सेकंद पुरेशी असल्याची धमकी जुरावलेव यांनी दिली आहे. नाटोमध्ये सहभागी होण्यासाठी फिनलँडच्या पंतप्रधान सॅना मरिन यांचे प्रयत्न सुरू आहेत. अवघ्या ३६ वर्षांच्या असलेल्या मरिन जगातील सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. 

युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाचं मोठं नुकसान झालेलं आहे. आठवड्याभरात युक्रेनला गुडघे टेकायला लावू, असा विश्वास पुतीन यांना होता. मात्र युक्रेननं कडवी झुंज देत रशियाचं मोठं नुकसान केलं. त्यामुळे रशिया बॅकफूटवर आला आहे. आता फिनलँड आणि स्वीडन यांच्यासारखे देश नाटोचे सदस्य होऊ पाहत आहेत. त्यामुळे रशियाचा तीळपापड झाला आहे.

आम्ही नाटोमध्ये सहभागी होऊ, अशी घोषणाच फिनलँडनं केली आहे. यानंतर रशियानं आपल्या शेजारी देशाचा वीज पुरवठा खंडित केला. फिनलँड त्यांना आवश्यक असलेल्या एकूण वीजेपैकी १० टक्के वीज रशियाकडे आयात करतो. फिनलँडला नाटोमध्ये जायचं असल्यास आमचं लक्ष्य पूर्णपणे वैध आहे. आम्ही या देशाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करू. रशियाच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रयत्न कराल, तर तुमची राख करू, असा इशारा जुरावलेव यांनी दिला आहे.

Web Title: Russia Warns Finland And Britain For Nuclear Attack With Sarmat Satan 2 Missile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.