रशिया लंडनवर टाकणार होता १९५४ मध्ये अणुबॉम्ब

By admin | Published: October 25, 2015 11:19 PM2015-10-25T23:19:06+5:302015-10-25T23:19:06+5:30

रशिया शीतयुद्धाच्या काळात १९५४ मध्ये लंडनवर अणुबॉम्ब टाकणार होता. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धात नागासाकी शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता त्यापेक्षाही जास्त शक्तिशाली असला असता.

Russia was about to leave London on 1952 for atom bomb | रशिया लंडनवर टाकणार होता १९५४ मध्ये अणुबॉम्ब

रशिया लंडनवर टाकणार होता १९५४ मध्ये अणुबॉम्ब

Next

लंडन : रशिया शीतयुद्धाच्या काळात १९५४ मध्ये लंडनवर अणुबॉम्ब टाकणार होता. हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धात नागासाकी शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला होता त्यापेक्षाही जास्त शक्तिशाली असला असता. नागासाकीवर जो अणुबॉम्ब टाकला त्यामुळे दुसरे महायुद्ध संपले होते.
ही भयंकर बाब ब्रिटिश अणुतज्ज्ञ विल्यम पेन्नी यांच्या पत्रातून समोर आली. ब्रिटनच्या राष्ट्रीय पुरातत्व विभागाने १९५० पासूनची जी पत्रे जाहीर करायला सुरुवात केली त्याचा हे ताजे पत्र भाग आहे. पेन्नी यांनी अ‍ॅटोमिक एनर्जी अ‍ॅथॉरिटीचे अध्यक्ष एडविन प्लोडेन यांना लिहिलेल्या पत्रात मॉस्को लंडनवर घातक अस्त्रे टाकण्याचा कट आखत असल्याचा इशारा दिला होता. ती अस्त्रे पडली असती तर तीन मैलांपर्यंत पूर्णपणे विध्वंस झाला असता.

Web Title: Russia was about to leave London on 1952 for atom bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.