रशियात ५० टक्के डॉक्टर घेणार नाहीत स्पुटनिक-व्ही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:13 AM2020-08-18T03:13:42+5:302020-08-18T07:03:18+5:30

रशियाने लशीची पहिली तुकडी उत्पादित केली आहे. ऑगस्टअखेर ती उपलब्ध करून द्यायची आहे.

Russia will not take 50% of doctors Sputnik-V | रशियात ५० टक्के डॉक्टर घेणार नाहीत स्पुटनिक-व्ही

रशियात ५० टक्के डॉक्टर घेणार नाहीत स्पुटनिक-व्ही

Next

मॉस्को : रशियात तयार झालेली जगातील पहिली नोंदणीकृत लस ‘स्पुटनिक व्ही’ घ्यायला रशियातील निम्म्यापेक्षा जास्त डॉक्टरांची तयारी नसल्याचे पाहणीत आढळले आहे. ही लस गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट आॅफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केली. ही लस किती सुरक्षित आहे याबद्दल काळजी व्यक्त होत असूनही मान्यता मिळण्यासाठी कामे वेगाने केली. रशियाने लशीची पहिली तुकडी उत्पादित केली आहे. आॅगस्टअखेर ती उपलब्ध करून द्यायची आहे.
>देशाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन म्हणाले की ‘स्पुटनिक व्ही’ लशीने कार्यकर्त्यांना ‘टिकून राहणारी प्रतिकार शक्ती’ दिली आहे. या कार्यकर्त्यांत पुतीन यांच्या एका मुलीचाही समावेश आहे. आरबीसी न्यूज संकेतस्थळाने आॅनलाईन केलेल्या पाहणीचा हवाला देऊन वृत्तात म्हटले आहे की, ‘‘रशियातील दोनपैकी एक डॉक्टर (५२ टक्के) म्हणाला की, स्पुटनिक व्ही लस (औपचारिक नाव ‘गॅम-कोविड-व्हॅक) आम्ही घेणार नाही.’’

Web Title: Russia will not take 50% of doctors Sputnik-V

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.