रशियन लष्कराचे बेपत्ता विमान कोसळले, 92 जणांचा मृत्यू
By admin | Published: December 25, 2016 10:54 AM2016-12-25T10:54:23+5:302016-12-25T23:00:16+5:30
रशियाच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,रशियन लष्कराचे Tu-154 हे विमान बेपत्ता
Next
ऑनलाइन लोकमत
सोची, दि. 25 - रशियन लष्कराचे रडारहून बेपत्ता झालेले Tu-154 हे विमान समुद्रात कोसळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 92 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 92 प्रवाशांमध्ये 9 रशियन पत्रकारांसह कलाकार आणि सैनिकांचा समावेश होता.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण रशियातील सोची येथून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. सीरियातील लटाकीया प्रांतात जात असताना ते बेपत्ता झालं . मात्र उड्डाणाच्या अवघ्या 20 मिनिटांत हे विमान रडारवरून बेपत्ता झाले. (राजकीय आश्रयासाठी विमानाचे अपहरण)रशियाच्या समुद्राच्या हद्दीतून हे विमान बेपत्ता झाले.(१६२ प्रवाशांसह विमान बेपत्ता!) त्यानंतर समुद्रामध्ये विमानाचे अवशेष सापडले आहेत. हा अपघात नक्की कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. रशिया सरकारकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
#FLASH Debris from missing Russian military plane found in Black Sea (Source: AFP)
— ANI (@ANI_news) 25 December 2016
Russian military plane that disappeared from radars after takeoff from Sochi was carrying 91 passengers: AFP
— ANI (@ANI_news) 25 December 2016