चीननंतर आता रशिया! पृथ्वीला स्पर्धा नडणार, हेरगिरीचा उपग्रह कोणत्याही क्षणी कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 02:06 PM2021-12-31T14:06:45+5:302021-12-31T14:22:52+5:30

येत्या काही आठवड्यात रशियाचा गुप्तचर लष्करी उपग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

russian military satellite could come crashing towards earth within weeks warn expert | चीननंतर आता रशिया! पृथ्वीला स्पर्धा नडणार, हेरगिरीचा उपग्रह कोणत्याही क्षणी कोसळणार

चीननंतर आता रशिया! पृथ्वीला स्पर्धा नडणार, हेरगिरीचा उपग्रह कोणत्याही क्षणी कोसळणार

Next

येत्या काही आठवड्यात रशियाचा गुप्तचर लष्करी उपग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशियाने नुकतेच या उपग्रहाचे प्रक्षेपण 'यशस्वीरित्या' केल्याचे म्हटले होते. दरम्यान आता या उपग्रहामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. रशियाने सोमवारी आपल्या नवीन जनरेशनच्या विशाल स्पेस रॉकेट अंगारा ए-5 च्या मदतीने एक गुप्तचर उपग्रह अवकाशात पाठवला. या लष्करी उपग्रहाचे वजन सुमारे 20 टन असल्याचे सांगितले जात आहे.

हा गुप्तचर उपग्रह आणि त्याचे बूस्टर रॉकेट येत्या काही आठवड्यांत पृथ्वीवर धडकू शकतात, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रशियाचे अंगारा ए-5 रॉकेट त्याचे गुप्तचर उपग्रह, शस्त्रे आणि नेव्हिगेशनसाठी आवश्यक उपग्रहांना अवकाशात पाठवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. एवढेच नाही तर या अवजड रॉकेटच्या मदतीने रशिया आपली चंद्र मोहिमही यशस्वी करण्याचे स्वप्न पाहत आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार या उपग्रहाचे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. परंतु रॉकेटच्या वरच्या बाजूला असलेले बूस्टर पर्सेई उड्डाणादरम्यान निकामी झाले. या कारणास्तव, रशियन उपग्रह त्याच्या योग्य कक्षेत पोहोचू शकला नाही. तज्ज्ञांनी सांगितले की हा अनियंत्रित उपग्रह आणि त्यात बसवलेले बूस्टर सुमारे २० टन वजनाचे आहेत आणि येत्या काही आठवड्यांत ते पृथ्वीवर धडकू शकतात. तज्ज्ञांच्या या दाव्यावर रशियन लष्कराच्या हायकमांडकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.

इंजिनमध्ये बिघाड
पर्सेईला त्याच्या चाचणी मोहिमेदरम्यान पाच इंजिन सुरू करायचे होते, परंतु दुसऱ्या इंजिनमध्ये बिघाड झाला. परिणामी, हा रशियन उपग्रह अजूनही त्याच्या अपेक्षित कक्षेत पोहोचला नाही. तसंच तो पृथ्वीवर पडण्यापूर्वी अनेक आठवडे तेथेच थांबू शकतो, अशी माहिती रशियातील माध्यमांकडून देण्यात आली. हा उपग्रह समुद्रसपाटीपासून २२,२३६ मैल उंचीवर पोहोचणार होता. गेल्या तीन वर्षांत रशियन अंतराळ संस्थेसाठी हा पहिलाच मोठा अपघात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: russian military satellite could come crashing towards earth within weeks warn expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.