कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:01 PM2020-03-25T16:01:43+5:302020-03-25T16:43:43+5:30

इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा हजमत सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो.

Russian President Putin wore Hazmat Suit To Visit Hospital for  Coronavirus Patients sna | कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच'

कोरोना व्हायरसबरोबरच्या युद्धातील 'ढाल' आहे हा 'सूट', आता बनला पुतीन यांचे 'संरक्षण कवच'

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकेसह जगातील तब्बल194 देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात व्लादिमीर पुतीन यांनी रुग्णालयात जाऊन केली रुग्णांची पाहणीयावेळी पुतीन यांनी परिधान केलेला सूट डॉक्‍टरांसाठीही आहे 'संरक्षण कवच'

मॉस्को - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. सुपर पावर म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेसह जगातील तब्बल194 देश कोरोना व्हायरसच्या विळख्यात आडकले आहेत. या महामारीमुळे आतापर्यंत जगात तब्बल 18,906 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4,23,142 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबरोबरच्या या लढाईत संपूर्ण जग, अशा एका 'ढाली'चा वापर करत आहे, जी कोरोनासाठी अभेद्य आहे. या ढालीचे नाव आहे 'हजमत सूट'. जाणून घेऊया काय आहे यात खास?

डॉक्‍टरांसाठी 'संरक्षण कवच' आहे हा सूट -
इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा हजमत सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. यामुळे डॉक्‍टर आणि नर्सेसना किलर व्हायरसपासून स्वतःचा बचाव करत रुग्णांवर उपचार करणे सहज शक्य होते. रशियाचे राष्‍ट्रपती व्लादिमीर पुत‍ीन यांनी हजमत सूट परिधान करून कोरोना पीडितांची पाहणी केली.

यामुळे या सूटला म्हणले जाते 'हजमत सूट' -
'हजमत सूट' हे हेजार्डस मटेरियल सूटचे संक्षिप्‍त नाव आहे. या सूटने संपूर्ण शरीर झाकता येते. हा सूट घातक पदार्थ, रसायने आणि जैविक धोकादायक गोष्टींपासून परिधान करणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण करतो. हा सूट पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंटचेच (PPE) एक रूप आहे. हा सूट डॉक्‍टर मंडळी रुग्णांवर उपचार करतानाच परिधान करतात. या सोबत चश्‍मा, ग्‍लोज आणि गाऊन परिधान केला जातो.

हा सूट ​कोरोनासाठी अभेद्य आहे -
हजमत सूट परिधान करण्याचे जगभरात वेगवेगळे प्रोटोकॉल आहेत. यावेळी व्हायरस अथवा एखादा आजार पसरूनये याचीही काळजी घेतली जाते. हा सूट तयार करताना कुठलाही व्हायरस अथवा धोकादायक पदार्थ यात शिरकाव करणार नाही, याची काळजी घेतली जाते. यापूर्वी इबोला संक्रमणाच्या वेळीही हा सूट परिधान करणे बंधनकारक करण्यात आले होते. 

अत्यंत विशेष असतो हा सूट -
हजमत सूटच्याकाही लेवल असतात. जसे, की ए, बी, सी अधवा डी. धोका कशा प्रकारचा आहे, या आधारावर हा सूट परिधान केला जातो. 'ए' लेवलचा हजमत सूट सर्वोधिक धोका असताना परिधान केला जातो. हा सूट परिधान केला, की विषारी पदार्थ, गॅस आदींपासून संरक्षण होते. यात ऑ‍क्‍सीजनसाठीही स्वतंत्र व्यवस्था असते. आणि दोन बाजूंनी रेडिओ लावलेला आसतो. हा रेडिओ आतून घातला जातो. लेवल 'बी' सूट उडणारे पदार्थ अथवा रसायनांपासून संरक्षण करतो. हा सूट एअर टाइट नसतो. कमी धोका असताना याचा वापर केला जातो. 

जाणून घ्या या सूटची किंमत - 
हजमत सूट आणि सर्व पीपीई परिधान कराण्यासाठी जवळपास अर्थातास लागतो. हा सूट मानसांच्या कपड्यांवरूनच परिधान करावा लागतो. यानंतर ग्लोज स्लिव्हज, शूज आणि मास्‍क घातले जाते. हा सूट परिधान करताना कुठलीही बाजू खुली राहणार नाही याची दक्षता घेतली जाते. इबोला आणि कोरोनासारख्या व्हायरसच्या प्रसारावेळी हा सूट केवळ परिधान करणेच आवश्यक नाही, तर तो सुरक्षितपणे काढणेही तेवढेच आवश्यक आहे. भारतात एका हजमत सूटची किंमत जवळपास 2500 रुपये एवढी आहे.

Web Title: Russian President Putin wore Hazmat Suit To Visit Hospital for  Coronavirus Patients sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.