पंतप्रधान मोदींच्या युक्रेनच्या दौऱ्याआधीच पुतीन यांचा खास मेसेज; म्हणाले, "तुमच्यासोबतचे संबंध..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:29 PM2024-08-15T23:29:02+5:302024-08-15T23:32:38+5:30

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

Russian President Vladimir Putin congratulated President Droupadi Murmu and PM Modi on Independence Day | पंतप्रधान मोदींच्या युक्रेनच्या दौऱ्याआधीच पुतीन यांचा खास मेसेज; म्हणाले, "तुमच्यासोबतचे संबंध..."

पंतप्रधान मोदींच्या युक्रेनच्या दौऱ्याआधीच पुतीन यांचा खास मेसेज; म्हणाले, "तुमच्यासोबतचे संबंध..."

Russian President Vladimir Putin :रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे. व्लादिमीर पुतिन यांनी भारताला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देताना दोन्ही देशांमधील 'विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी' मजबूत करण्यासाठी मॉस्कोची वचनबद्धतेची आठवण करुन दिली. महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या युक्रेन दौऱ्याआधी पुतीन यांनी हे विधान केले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेला संघर्ष अद्यापही संपलेला नाही.

"प्रिय राष्ट्रपती महोदया, प्रिय पंतप्रधान, कृपया भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझे हार्दिक अभिनंदन स्वीकारा. आपल्या देशाने स्वतंत्र विकासाच्या ७७ वर्षांच्या काळात, सामाजिक-आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि इतर अनेक क्षेत्रात सार्वभौम यश मिळवले आहे. स्वातंत्र्य दिनाने जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त यश मिळवले आहे आणि जागतिक स्तरावर उच्च प्रतिष्ठा मिळवली आहे. विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी म्हणून आम्ही भारतासोबतच्या आमच्या संबंधांना महत्त्व देतो," असे व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे.
 
“आम्ही भारतासोबतच्या संबंधांना विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी म्हणून खूप महत्त्व देतो. मला विश्वास आहे की मॉस्कोमध्ये नुकत्याच झालेल्या आमच्या चर्चेनंतर झालेल्या करारांची सतत अंमलबजावणी केल्यास रशिया-भारत सहकार्याच्या बहुआयामी विकासाला हातभार लागेल, असेही पुतीन यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी युक्रेनच्या राजधानीला भेट देणार आहेत. तिथे ते राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करतील आणि रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी नवीन जागतिक प्रयत्नांबद्दल चर्चा करतील. २४ ऑगस्ट रोजी युक्रेनच्या राष्ट्रीय दिनाच्या आसपास पंतप्रधान मोदींचा दौरा नियोजित आहे आणि दोन्ही देशांच्या दौऱ्याचा भाग म्हणून ते पोलंडलाही भेट देऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरम्यान, व्लादिमीर पुतीन यांच्या व्यतिरिक्त, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह जगभरातील विविध नेत्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहे. मॅक्रॉन म्हणाले की त्यांना जानेवारीत भारत भेटीदरम्यान मिळालेले स्वागत आठवले. आमच्या धोरणात्मक भागीदारीसाठी निश्चित केलेली महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे, असं इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Russian President Vladimir Putin congratulated President Droupadi Murmu and PM Modi on Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.