गरज पडल्यास पुतीन सैन्याची मदत घेणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:48 PM2020-04-15T12:48:34+5:302020-04-15T12:48:45+5:30
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत हे जाहीर केलं की, येते दोन आठवडे परिस्थिती अजून भिषण होण्याची शक्यता आहे.
जसं चिनच्या भिंतीआड काय घडतं हे कळायला वेळ लागतो, तसंच रशियात काय घडतं आहे याचीही जगभरात उत्सुकता असते.
पुतीन यांच्या पोलादी राजवटीत रशियानं ऑलिम्पिक पार पाडलं, त्यानिमित्तानं जगानं रशिया पाहिला, आज तोच रशिया कोरोनाशी लढतो आहे.
आजवर सुमारे 21 हजार लोकांना तिथं लागण झाली असून 17क् लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
दोन आठवडे झाले सर्व मोठय़ा शहरांत लॉक डाऊन आहे.
मात्र संसर्ग वाढतो आहे.
मॉस्को शहरात बाधितांची संख्या आणि रुग्णवाहिकांचे सायरन आवाज वाढत आहेत.
शनिवारचं चित्र तर अस्वस्थ करणारं होतं.
मॉस्को शहराच्या बाहेर अॅम्ब्यूलन्सच्या रांगा लागलेल्या होत्या.
रुग्ण दवाखान्यात दाखल करण्यासाठी त्या घेऊन आल्या होत्या.
पण दवाखान्यात जागाच नाही अशी अवस्था.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत एक स्थानिक रुग्णवाहिका चालक सांगतो की, एक रुग्ण घेऊन तो आला तर त्याला दवाखान्यात दाखल करायला त्याला 15 तास वाट पाहावी लागली.
मॉस्को आणि सेंट पिटसबर्ग या शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत हे जाहीर केलं की, येते दोन आठवडे परिस्थिती अजून भिषण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली नाही तर सैन्य रस्त्यावर उतरवावं लागेल. लष्कराचे साधनस्त्रोत वापरावे लागतील.
धास्तावलेले लोक या निर्णयानं अधिक धास्तावण्याची शक्यता आहे.