भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेत व्लादिमीर पुतिन अनुपस्थित राहणार; कारणही आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 05:48 PM2023-08-25T17:48:52+5:302023-08-25T17:55:53+5:30

भारतात या वर्षी सप्टेंबरमध्ये जी-२० शिखर परिषद होणार आहे, ज्याची तयारी जोरात सुरू आहे.

Russian President Vladimir Putin will not attend the G-20 summit in Delhi next month. | भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेत व्लादिमीर पुतिन अनुपस्थित राहणार; कारणही आलं समोर

भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेत व्लादिमीर पुतिन अनुपस्थित राहणार; कारणही आलं समोर

googlenewsNext

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या जी-२० परिषदेत सहभागी होणार नाही. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, पुतिन सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी भारत दौऱ्याचे नियोजन करत नाहीय. सध्या त्यांचे मुख्य लक्ष एका विशिष्ट लष्करी कारवाईवर आहे. 

भारतात या वर्षी सप्टेंबरमध्ये जी-२० शिखर परिषद होणार आहे, ज्याची तयारी जोरात सुरू आहे. परिषदेच्या संदर्भात, भारताने सर्व जी-२० सदस्य देशांना, निमंत्रितांना आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या नेत्यांना आमंत्रणे पाठवली होती. मात्र पुतीन या शिखर परिषदेला उपस्थित राहणार की नाही, याची पुष्टी झालेली नाही. याआधी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेलाही पुतिन पोहोचले नव्हते. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने पुतिन यांना युद्धगुन्हे, नरसंहार आणि युक्रेनमध्ये मुलांना जबरदस्तीने हस्तांतरित केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. त्यामुळेच पुतिन अटक टाळण्यासाठी ब्रिक्स परिषदेला प्रत्यक्ष पोहोचले नाहीत, असे मानले जाते.

भारत सध्या जी-२०चे आयोजन करत आहे. हा समूह जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक आंतरशासकीय मंच आहे. हे सदस्य जागतिक जीडीपीच्या अंदाजे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या ७५ टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दोन तृतीयांश प्रतिनिधित्व करतात. या गटात अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे. 

येवगेनीचा विमान अपघातात मृत्यू

२३ ऑगस्ट रोजी रशियाकडून बातमी आली होती की, वॅगनर आर्मी चीफ येवगेनी प्रिगोझिन यांचे विमान क्रॅश झाले आहे. हा विमान अपघात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान झाला. या अपघातात प्रीगोझिनसह १० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. प्रिगोझिन त्याच वॅगनर सैन्याचा प्रमुख होता, ज्याने जूनमध्ये रशियन सैन्याविरुद्ध बंड केले. विशेष बाब म्हणजे प्रिगोझिन हे एकेकाळी पुतिन यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक मानले जात होते.

सप्टेंबरमध्ये शिखर परिषद होणार-

जी-२० नेत्यांची शिखर परिषद ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली सरकार आणि महानगरपालिकेच्या सर्व शाळा आणि कार्यालये ८, ९ आणि १० सप्टेंबर रोजी बंद राहतील.

Web Title: Russian President Vladimir Putin will not attend the G-20 summit in Delhi next month.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.