शक्तीशाली नेता, जलतरणपटू, संघर्षातून यश अशी आहे पुतिन यांची लाइफस्टाइल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 01:40 PM2018-10-04T13:40:10+5:302018-10-04T13:46:14+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं नाव जगातल्या सर्वात शक्तीशाली नेत्यांमध्ये घेतलं जातं. २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे आपल्या शाही लाइफस्टाइलसाठीही नेहमी चर्चेत असतात.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं नाव जगातल्या सर्वात शक्तीशाली नेत्यांमध्ये घेतलं जातं. ते २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे आपल्या शाही लाइफस्टाइलसाठीही नेहमी चर्चेत असतात. त्यांचा जीवनाचा प्रवास एका योध्यासारखा राहिला आहे. चला जाणून घेऊ त्यांच्या जीवनातील काही खास गोष्टी....
साहस आणि रोमांच आहे पुतिन यांची पसंत
आतापर्यत ४ वेळा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झालेले पुतिन यांना साहस आणि रोमांच पसंत आहे. ते एक कुशल जलतरणपटू तर आहेतच सोबतच ते उत्तम घोडेस्वारही आहेत. त्यांना अॅडव्हेंचरशी निगडीत अॅक्टिव्हिटी करताना नेहमीच बघितले जाते. इतकेच नाही तर पुतिन यांनी मार्शल आर्टचंही ट्रेनिंग घेतलं आहे.
टाइम मॅगझिनच्या कव्हरवर फोटो
२००८ मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हरवर पुतिन हे या अंदाजात दिसले होते. प्रसिद्ध फोटोग्राफर पेल्टन यांना या फोटोसाठी २००८ चा वर्ल्ड प्रेस फोटोचा पुरस्कारही मिळाला होता. या फोटोला त्यावेळी इतकी प्रसिद्धी मिळाली होती की, या फोटोतून पुतिन यांची जगतील प्रतिमा एक कठोर, त्वरित निर्णय घेणारा आणि चाणाक्ष राजकीय नेता म्हणून झाली.
लेनिन आणि स्टॅलिनसोबत खास नातं
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा जन्म एका सामान्य परिवारात झाला होता. त्यांचे आजोबा लेनिन यांच्या कंट्री हाऊसमध्ये शेफ होते, त्यानंतर ते स्टॅलिनचेही शेफ झाले. सेंट पीट्सबर्गमध्ये जन्माला आलेल्या पुतिन यांच्या जीवनाची सुरुवात १ खोली असलेल्या घरातून झाली होती. तेथून ते केवळ रशियाच्याच नाही तर जगातल्या सर्वात शक्तीशाली लोकांच्या यादीत जाऊन पोहोचले.
नास्तिक होते पुतिन नंतर झाले आस्तिक
व्लादिमिर पुतिन हे सुरुवातीच्या जीवनात साम्यवादी विचारांनी फार जास्त प्रभावित होते. विद्यार्थी असतानापासून ते स्वत:ला नास्तिक सांगत होते. पण त्यांच्या जीवनात घडत गेलेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे ते देवावर विश्वास ठेवू लागले. १९९० मध्ये त्यांच्या पत्नीचा कार अपघात आणि त्याच वर्षी घरात लागलेल्या आगीनंतर ते चर्चमध्ये जाऊ लागले. पुतिन आता नियमीतपणे चर्चमध्ये जातात.
पुतिन यांची अॅपल वॉच होती चर्चेत
रशियाचे राष्ट्राध्यक्ष आपल्या महागड्या शौकांसाठीही ओळखले जातात. त्यांच्याकडे अनेक महागड्या कार आणि घड्याळांचं कलेक्शन आहे. ते अॅपल वॉचच्या कस्टमाइज कलेक्शनचा वापर करतात.
कुत्र्यांची नावे ठेवण्यासाठी देशव्यापी स्पर्धा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या लाइफस्टाइलला सहजपणे किंग साइज म्हटले जाऊ शकते. त्यांनी आपल्या पाळिव कुत्र्यांची नावे ठेवण्यासाठी देशव्यापी स्पर्धा घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बल्गेरियन शेफर्डचं नाव बफी ठेवलं होतं. त्यांच्याकडे अनेक पाळीव प्राणी आहेत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी मोठा खर्च केला जातो.
स्वित्झर्लंडची जिमनॅस्ट गर्लफ्रेन्ड?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची कथित गर्लफ्रेन्ड आणि तिच्याकडून झालेल्या मुलीचा किस्सा प्रसारमाध्यमात आला आहे. स्वित्झर्लंडची जिमनास्ट एलिना काबावेवासोबत त्यांच्या कथित अफेअरची चांगलीच चर्चा होत असते. एलिनाने याचवर्षी एका मुलीला जन्म दिला. स्विस मीडियामध्ये या मुलीचे वडील रशियाचे राष्ट्राध्यक्ष सांगण्यात आले आहेत. पुतिन यांनी पत्नीकडून ३१ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला आहे. त्यांना दोन मुलीही आहेत.