खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 11:10 PM2020-09-07T23:10:01+5:302020-09-07T23:13:23+5:30

रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, या आठवड्यापासून ही कोरोना लस सामान्य नागरिकांनाही द्यायला सुरुवात करण्यात येणार आहे. ही लस राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी 11 ऑगस्टला लॉन्च केली होती.

russian sputnik v coronavirus vaccine clinical trials will be held this month in india | खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

Next
ठळक मुद्देस्पुतनिक व्हीच्या अखेरच्या टप्प्यावरील क्लिनिकल ट्रायलला याच महिन्यात भारतात सुरुवात होणार. या आठवड्यापासून ही कोरोना लस सामान्य नागरिकांनाही द्यायला सुरुवात करण्यात येणार आहे.2020च्या अखेरपर्यंत 20 कोटी डोस तयार करण्याचे लक्ष्य.

मॉस्को/नवी दिल्ली - रशियन कोरोनालस स्पुतनिक व्हीच्या अखेरच्या टप्प्यावरील क्लिनिकल ट्रायलला याच महिन्यात भारतात सुरुवात होणार आहे. याशिवाय यूएई, सौदी अरेबिया, फिलिपिन्स आणि ब्राझीलमध्ये याच महिन्यात या लशीच्या क्लिनिकल ट्रायलला सुरू होणार आहे, अशी माहिती, ही लस तयार करण्यासाठी निधी देणाऱ्या रशियन डॉयरेक्ट इनव्हेस्ट फंडचे सीईओ किरिल दिमित्रीव यांनी दिली आहे. एवढेच नाही, तर या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचा प्राथमिक निकाल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

रशियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, या आठवड्यापासून ही कोरोना लस सामान्य नागरिकांनाही द्यायला सुरुवात करण्यात येणार आहे. ही लस राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी 11 ऑगस्टला लॉन्च केली होती. ही लस मॉस्‍कोतील गामलेया रिसर्च इंस्टिट्यूटने रशियन संरक्षण मंत्रालयाच्या साथीने एडेनोव्हायरसला बेस बनवून तयार केली आहे. 

2020च्या अखेरपर्यंत 20 कोटी डोस तयार करण्याचे लक्ष्य -
रशियन डॉयरेक्ट इन्वेस्टमेंट फंडने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की या लशीचे उत्पादन भारत, दक्षिण कोरिया, ब्राझील, सौदी अरेबिया, टर्की आणि क्यूबामध्ये करण्यात येणार आहे. सप्टेंबर 2020 मध्ये मोठ्या प्रमाणावर या लशीचे उत्पादन सुरू होण्याची आशा आहे. तसेच 2020च्या अखेरपर्यंत या लशीचे 20 कोटी डोस तयार करण्याचे रशियाचे लक्ष्य आहे. यातील 3 कोटी डोस केवळ एकट्या रशियन नागरिकांसाठीच असणार आहेत. 

रशियाच्या पहिल्या सॅटेलाईटपासून लशीला मिळाले नाव -
रशियाच्या पहिल्या सॅटेलाईटपासून या लशिला स्पुतनिक, असे नाव मिळाले आहे. रशियाने स्पुतनिक सॅटेलाईट 1957 मध्ये लॉन्च केले होते. तेव्हाही रशिया आणि अमेरिकेदरम्यान अंतराळातील स्पर्धा सुरू होती. कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याच्या बाबतीतही अमेरिका आणि रशिया यांच्यात स्पर्धा होती. विशेष म्हणजे किरिल दिमित्रीव यांनीही लशीची स्पर्धा 'स्पेस रेस' सारखीच होती, असे म्हटले आहे. US TVशी बोलताना ते म्हणाले होते, 'जेव्हा अमेरिकेने Sputnikचा (सोव्हियत यूनियनने तयार केलेले जगातील पहिले सॅटेलाइट) आवाज ऐकला तेव्हा ते अवाक झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या -

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावा

CoronaVaccine : खूशखबर! स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूवात

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ

Web Title: russian sputnik v coronavirus vaccine clinical trials will be held this month in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.