Russian-Ukraine War: युद्धाची खुमखुमी रशियाला की अमेरिकेला? शस्त्रसंधीत करतेय अण्वस्त्रांचा युद्धसराव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 02:08 PM2022-01-31T14:08:22+5:302022-01-31T14:09:05+5:30
अमेरिकेचा हा युद्धसराव नियमित नव्हता, भविष्यात योजना तयार केली होती. परंतू आताच युद्धाचे वारे सुरु असताना हे पाऊल उचलल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचे ढग दाटलेले असताना अमेरिकारशियालायुद्धासाठी उकसावत आहे. अमेरिकेने अणुबॉम्ब वर्षावाचा युद्धसराव सुरु केला आहे. अमेरिकेच्या अण्वस्त्रांची टीम स्ट्रॅटेजिक कमांडने ग्लोबल लाईटनिंग अभ्यास सुरु केला आहे. सैन्याच्या अण्वस्त्र युद्धाच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. दुसरीकडे रशियाचे नौदल काळ्या समुद्रात जोरदार युद्धसराव करत आहे.
अमेरिकेचा हा युद्धसराव नियमित नव्हता, भविष्यात योजना तयार केली होती. परंतू आताच युद्धाचे वारे सुरु असताना हे पाऊल उचलल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रशिया युक्रेनवर हल्ला करू शकतो, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन वारंवार देत आहेत. यामुळे अमेरिकेने हजारोंचे सैन्य युक्रेनसीमेवर हायअलर्टवर ठेवले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या या सरावात अमेरिकेच्या लष्कराने रशियाशी काल्पनिक तणाव असताना अणुबॉम्ब टाकण्याचा सराव केला होता. चीनसोबतच्या तणावादरम्यान अमेरिकेचे सैन्य यावर्षी अणुयुद्धाचा सराव करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, सराव दरम्यान कोणताही अणुबॉम्ब किंवा त्याचे प्रक्षेपण केले जाणार नाही. त्याच्या जागी, यूएस स्ट्रॅटेजिक कमांड आण्विक कमांड आणि कंट्रोल सर्किट आणि आण्विक युद्ध योजनेनुसार निर्णय घेण्याची क्षमता तपासेल.
Swap at Sea ⚓ 🌊
— U.S. Navy (@USNavy) January 30, 2022
The submarine #USSWyoming (SSBN 742) prepares to execute an exchange of command and crews in the Atlantic, Jan. 24.
This regularly scheduled exchange demonstrates the operational flexibility of our ready, reliable ballistic-submarine force. #NavyReadinesspic.twitter.com/HHmlMNPjp1
अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला झाला तर काही सैनिक नक्कीच वाचतील आणि जे वाचतील ते शत्रू देशावर आपला शेवटचा माणूस संपेपर्यंत अण्वस्त्र हल्ला करतील. या नावीन्यपूर्ण विचारसरणीची चाचणी यंदाच्या अभ्यासात होणार आहे.