पुतीनविरोधात रशियाचे लष्कर करू शकते बंड; कमांडर गिरकिन यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 07:19 AM2023-05-01T07:19:13+5:302023-05-01T07:19:28+5:30
प्रिगोझिन हे पूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय होते.
मॉस्को - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात लष्कर बंड करू शकते, असा इशारा कमांडर इगोर गिरकिन यांनी दिला आहे. युक्रेनच्या बाखमूत येथून आपल्या सैनिकांना माघारी बोलाविण्याची धमकी रशियातील प्रायव्हेट आर्मी वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवेगेनी प्रिगोझिन यांनीही नुकतीच दिली. आमच्या सैनिकांना पुतीन यांच्याकडून कोणतीही मदत पुरविण्यात येत नाही, असा आरोप प्रिगोझिन यांनी केला होता.
त्या देशाचे कमांडर इगोर गिरकिन यांनी सांगितले की, वॅगनर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन यांनी रशिया सरकारला न कळविता सैनिक माघारी बोलावले तर ते सैनिकांनी उघडपणे पुकारलेले बंड असेल. रशियाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. प्रिगोझिन हे पूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय होते. कट्टरपंथी लोकांमध्ये प्रिगोझिन यांची लोकप्रियता वाढत असून, पुतीन यांना ही गोष्ट अजिबात पसंत नाही.