इजिप्तजवळ रशियाचे विमान कोसळले, २०० हून अधिक ठार
By admin | Published: October 31, 2015 02:04 PM2015-10-31T14:04:49+5:302015-10-31T15:16:41+5:30
इजिप्तहून रशियाच्या दिशेने निघालेले जेट विमान इजिप्तमधील शनिवारी सिनाई पेनिनसुला येथे कोसळले असून विमानातील २१७ प्रवाशांसह एकूण २२४ मृत्यूमुखी पडल्याची भीती आहे
Next
>
ऑनलाइन लोकमत
कैरो,दि. ३१ - इजिप्तहून रशियाच्या दिशेने निघालेले जेट विमान इजिप्तमधील शनिवारी सिनाई पेनिनसुला येथे कोसळले असून विमानातील २१७ प्रवाशांसह एकूण २२४ मृत्यूमुखी पडल्याची भीती आहे. रशियाचे पंतप्रधान शरीफ इस्माईल यांच्या कार्यालयातील अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इजिप्तमधील शर्म-एल-शेख येथून रशियाच्या सेंटपीटर्सबर्गच्या दिशेने निघालेले 'एअरबस ए-३२१' या जेट विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या काही वेळातच संपर्क तुटला आणि ते रडारवरून दिसेनासे झाले. त्यानंतरक काही वेळाने ते सिनाई पेनिन्सुला येथे कोसळले.
इजिप्त सरकारने तातडीने मंत्रमंडळाच्या पातळीवर आपत्कालीन समितीची नेमणूत केली आहे तसेच सैन्याच्या ४५ अँब्युलन्स घटनास्थळी धाडल्या. मृतदेहांना बाहेर काढणे, तसेच जखमींना तातडीने मदत देणे सुरू करण्यात आले आहे.
सिनाईमधल्या काही भागामध्ये इस्लामी दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू असल्या तरी, या विमानाला पाडण्यात आल्याची शक्यता दिसत नसल्याचे ईजिप्तच्या सुरक्षा दलांनी म्हटले आहे.