रशियाचे शक्तिशाली अध्यक्ष पुतिन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅडल्ट स्टार देणार आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 04:54 PM2017-11-03T16:54:02+5:302017-11-03T17:31:38+5:30
रशियामध्ये पुढच्यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आतापासून चर्चा सुरु झाली आहे.
मॉस्को - रशियामध्ये पुढच्यावर्षी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आतापासून चर्चा सुरु झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीत काही नवीन चेहरे व्लादिमीर पुतीन यांना आव्हान देऊ शकतात. ज्यामुळे पुतिन यांचा विजयाचा मार्ग अधिक खडतर बनेल. या सर्व संभावनांच्या पार्श्वभूमीवर रशियातील एक फेमस अॅडल्ट स्टार ऐलेना बर्कोवाने पुतिन यांच्याविरोधात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
मुर्मान्स्क शहरात राहणा-या ऐलेना बर्कोवाने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. ऐलेनाने याआधी सोची शहरातून महापौरपदाची निवडणूकही लढवली होती. 32 वर्षाच्या ऐलेनाचे इंस्ट्राग्रामवर 6.5 लाख फॉलोअर्स आहेत. त्यावरुन तिच्या लोकप्रियतेची कल्पना येते.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले तर मी बलात्कार, लैंगिक छळ या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद करीन असे तिने व्हिडीओमधून आवाहन केले आहे. सत्तेत आल्यानंतर मी पुरुषांकडून घटस्फोटाचा अधिकार काढून घेईन. त्याशिवाय शाळेमध्ये लैंगिक शिक्षण बंधनकारक असेल असे ऐलेनाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
रशियामध्ये महिलाही निवडणूक प्रचारात मोठया प्रमाणावर सक्रिय होत असल्याने आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असे ऐलेनाने म्हटले आहे. ऐलेनाने याआधी सोची शहरातून महापौरपदाची निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी ऐलेनाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. ऐलेनाला पुरुषांचा घटस्फोटाचा अधिकार यासाठी संपवायचा आहे कारण अनेकदा घटस्फोटानंतर मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी महिलांवर येऊन पडते.