पूर्व युक्रेनमधील दोन शहरांत रशियन समर्थकांचे सार्वमत
By admin | Published: May 11, 2014 06:03 PM2014-05-11T18:03:27+5:302014-05-12T00:13:36+5:30
डोनस्टेक ( युक्रेन) पूर्व युक्रेनमधील दोन शहरांत रशियन समर्थकांनी सार्वमतासाठी मतदान घेण्यास सुरुवात केली असून, युक्रेन पुन्हा एकदा फुटणार असे चिन्ह आहे. अमेरिकेने हे सार्वमत बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून, पाश्चिमात्य देश युक्रेनमध्ये नागरी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करीत आहेत.
डोनस्टेक ( युक्रेन) पूर्व युक्रेनमधील दोन शहरांत रशियन समर्थकांनी सार्वमतासाठी मतदान घेण्यास सुरुवात केली असून, युक्रेन पुन्हा एकदा फुटणार असे चिन्ह आहे. अमेरिकेने हे सार्वमत बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून, पाश्चिमात्य देश युक्रेनमध्ये नागरी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करीत आहेत.
रशियन समर्थकांच्या ताब्यात असणार्या बारा शहरांपैकी दोन शहरांत हे सार्वमत घेण्यात आले असून, यामुळे युक्रेनमधील राजकीय समस्या अधिकच तीव्र होईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे रशिया व पाश्चिमात्य देश यांच्यातील तणाव वाढेल, असेही दिसत आहे.
येस वा हो असे मत फक्त रशियाकडून मान्य केले जाईल; पण त्यामुळे युक्रेनमधील अध्यक्षीय निवडणुकांचे महत्त्व कमी होईल. येत्या दोन आठवड्यांत युक्रेनमध्ये निवडणुका होत असून, त्यानंतर युक्रेनला बर्यापैकी स्थैर्य मिळेल असे युरोपियन युनियनचे मत आहे. अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना पूर्व युक्रेनमध्ये हिंसाचार चालू असून, रात्रभर स्फोटांचे आवाज चालू आहेत. पूर्व युक्रेनमधील घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारची कारवाई सुरू आहे.
रशियन बंडखोर सशस्त्र असून, डोनस्टेक व लुगान्स या दोन शहरांत मतदान चालू असल्याने त्यांनी या शहरात आश्रय घेतला आहे. युक्रेनच्या नियमानुसार सार्वमत बेकायदेशीर असून, तो देश फोडण्याचा प्रयत्न समजला जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा आंतरराष्ट्रीय नियमांचा तसेच युक्रेनच्या अखंडत्वाचा भंग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या शहरांनी सार्वमतात स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतल्यास नागरी व्यवस्था कोलमडेल व तेथील अर्थव्यवस्थेचा विनाश होईल, असा इशारा युक्रेनचे अंतरिम अध्यक्ष ओलेक्सांदर तुर्चीनोव्ह यांनी दिला आहे.