रशियाचे अवकाशयान आठवड्यात कोसळणार?
By admin | Published: May 1, 2015 01:54 AM2015-05-01T01:54:56+5:302015-05-01T01:54:56+5:30
रशियाने अंतराळस्थानकावर साहित्य घेऊन जाण्यासाठी मंगळवारी प्रक्षेपित केलेले अवकाश यान नियंत्रण सुटल्यामुळे पृथ्वीवर कोसळणार असून, ही घटना पुढच्या आठवड्यात घडेल, असे रशियाने जाहीर केले आहे.
मॉस्को : रशियाने अंतराळस्थानकावर साहित्य घेऊन जाण्यासाठी मंगळवारी प्रक्षेपित केलेले अवकाश यान नियंत्रण सुटल्यामुळे पृथ्वीवर कोसळणार असून, ही घटना पुढच्या आठवड्यात घडेल, असे रशियाने जाहीर केले आहे.
प्रोग्रेस एम-२७ एम हे अवकाश यान मंगळवारी पृथ्वीबाहेर पडल्यानंतर त्याच्यावरील नियंत्रण सुटले आहे. हे यान पृथ्वीवर कोसळणार असून, ही घटना पुढच्या आठवड्यात घडेल, असे रशियन अवकाश संस्था रोस्कोमोसने म्हटले आहे.
५ ते ७ मे च्या दरम्यान हे यान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल व हवामानाच्या संपर्कात येताच त्याला आग लागेल, असा रशियन अवकाश संस्थेचा अंदाज आहे. पण हे प्रोग्रेस शिप कोठे पडेल आणि त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल हे आताच सांगता येणार नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
प्रोग्रेस यान मंगळवारी सोयूझ रॉकेटवरून कझाकिस्तानातील बैकानूर अवकाशतळावरून यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले. पण तिसऱ्या टप्प्यात रॉकेटपासून सुटल्यानंतर त्यावर नियंत्रण राहिलेले नाही.
४या यानात १,९४० पौंड (८८० किलो ) साहित्य असून, त्यात ११० पौंड प्राणवायू , ९२६ पौंड पाणी, ३,१२८ पौंड सुटे भाग, तसेच प्रयोगासाठी लागणारे हार्डवेअर आहे असे नासाने म्हटले आहे.
४रशियाच्या अवकाश कार्यक्रमात अलीकडच्या काळात अनेक अपघात घडले असून, प्रोग्रेस यानाची दुर्घटना ही या साखळीतील ताजी घटना आहे.