SAARC मध्ये तालिबानला बोलवा; पाकिस्तानने केली मागणी, बैठकच झाली रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 08:53 AM2021-09-22T08:53:35+5:302021-09-22T08:57:01+5:30

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या सार्क देशांच्या परिषदेत तालिबानला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली होती.

saarc foreign ministers meeting in new york cancelled after pakistan demands of taliban entry | SAARC मध्ये तालिबानला बोलवा; पाकिस्तानने केली मागणी, बैठकच झाली रद्द!

SAARC मध्ये तालिबानला बोलवा; पाकिस्तानने केली मागणी, बैठकच झाली रद्द!

Next
ठळक मुद्देSAARC मध्ये तालिबानला सहभागी करून घ्यापाकिस्तानच्या मागणीला अन्य देशांचा जोरदार विरोधपाकिस्तानची अट अमान्य करत बैठकच केली रद्द

न्यूयॉर्क: अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर एकेक करून तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवला. यानंतर सत्ता स्थापन केली. मात्र, अद्यापही जागतिक पातळीवरील देश वेट अँड वॉचची भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. चीन, पाकिस्तानसारख्या मोजक्या देशांनी तालिबान सरकारला पाठिंबा दिला असला, तरी उर्वरित देशांनी याबाबत मौन बाळगले आहे. अशातच अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये होत असलेल्या सार्क देशांच्या परिषदेत तालिबानला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली होती. मात्र, यानंतर ही परिषदच रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (saarc foreign ministers meeting in new york cancelled after pakistan demands of taliban entry)

अमेरिकेत उत्साहात गणेशोत्सव साजरा; मराठी कला मंडळाची परंपरा अखंडित 

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना म्हणजेच SAARC मधील सहयोगी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक बैठक २५ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तालिबानला सहभागी करून घ्यावे, अशी मागणी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली होती. जागतिक पातळीवर तालिबानला समर्थन मिळावे, यासाठी पाकिस्तानकडून होत असलेल्या प्रयत्नांना हा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे. 

लहान मुलांसाठी संजीवनी! ‘या’ कंपनीची लस ठरणार अधिक प्रभावी, लवकरच मिळणार मंजुरी

बहुतांश देशांचा विरोध

सार्क बैठकीत तालिबानला सहभागी करून घेण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला बहुतांश देशांनी विरोध दर्शवला. यानंतर, अफगाणिस्तानच्या अशरफ घनी सरकारमधील परराष्ट्र मंत्र्यांना कोणत्याही परिस्थितीत या बैठकीत सहभागी करून घ्यायचे नाही, अशी अट पाकिस्तानने ठेवली. मात्र, या अटीलाही अन्य देशांकडून केराची टोपली दाखवण्यात आली. यानंतर ही बैठकच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तालिबान सरकारच्या परराष्ट्र मंत्र्यांना सहभागी करून घेण्याचा सार्क देशांचा निर्णय पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.  

“देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार”

दरम्यान, तालिबानी नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी त्यांच्यात सत्तेसाठी प्रचंड संघर्ष सुरू असून, उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांना ओलीस ठेवले आहे आणि पंतप्रधान व सर्वोच्च तालिबानी नेता हैबतुल्ला अखुंदजादा सध्या बेपत्ता आहे. त्याला ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे. हैबतुल्ला अखुंदजादा आणि मुल्ला बरादर हे दोघे हिंसाचारात जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर मुल्ला बरादरला ओलीस ठेवले असून, अखुंदजादा बहुधा मरण पावला आहे. 
 

Web Title: saarc foreign ministers meeting in new york cancelled after pakistan demands of taliban entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.