प्राणांची आहुती; पण मैत्रिणींची अखेरपर्यंत साथ

By admin | Published: July 5, 2016 04:16 AM2016-07-05T04:16:34+5:302016-07-05T04:16:34+5:30

ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला बांगलादेशी तरुण वाचूू शकला असता. दहशतवाद्यांनी त्याला निघून जाण्यास सांगितलेही होते. मात्र, त्याने आपल्या मैत्रिणींना एकटे सोडून

Sacrifice of life; But with friends till the end | प्राणांची आहुती; पण मैत्रिणींची अखेरपर्यंत साथ

प्राणांची आहुती; पण मैत्रिणींची अखेरपर्यंत साथ

Next

ढाका : ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला बांगलादेशी तरुण वाचूू शकला असता. दहशतवाद्यांनी त्याला निघून जाण्यास सांगितलेही होते. मात्र, त्याने आपल्या मैत्रिणींना एकटे सोडून न जाण्याचा पर्याय निवडला व नंतर तो मारला गेला.
फराज अयाज हुसैन (२०), असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. सोशल मीडियावर त्याची प्रचंड प्रशंसा होत असून, लोक त्याला नायक म्हणत आहेत.
हुसैन अमेरिकेतील एमोरी विद्यापीठात शिकत होता. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे तो बांगलादेशला आला होता. हुसैन त्याच्या दोन परदेशी मैत्रिणी अबिंता कबीर (अमेरिकन नागरिक) आणि तरुषी जैन हिच्यासह होली आर्टिजन उपाहारगृहात आला होता. (वृत्तसंस्था)

तारिषी जैनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
हल्ल्यात मृत्यू पावलेल्या १९ वर्षीय तारिषी जैन हिच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी ४.१५ वाजता गुडगावस्थित सुखराली गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
उपाहारगृहावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी हल्ल्यानंतर २० मिनिटांतच २० ओलिसांना ठार मारले होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

ढाका हल्ल्यामागे देशी दहशतवादी
बांगलादेशने ढाक्यातील हल्ल्यासाठी देशी दहशतवादी आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’कडे बोट दाखविले असून, इस्लामिक स्टेटचा (इसिस) हात असण्याची शक्यता फेटाळली आहे. करतोय.

पाकचा हात नाही
ढाका हल्ल्यात आपला सहभाग असल्याची वृत्ते पाकिस्तानने फेटाळली असून ही वृत्ते निराधार, बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे.

बांगलादेशने मृतांना वाहिली श्रद्धांजली
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह संपूर्ण देशाने ढाका येथील हल्ल्यात ठार झालेल्या भारतीय तरुणीसह २२ जणांना श्रद्धांजली वाहिली.
ढाका छावणीतील बांगलादेश आर्मी स्टेडियम येथे झालेल्या श्रद्धांजली सोहळ्यात विविध देशांचे मुत्सद्दी, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये गोळा झाले होते.

Web Title: Sacrifice of life; But with friends till the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.