‘आत्मघातकी बॉम्बर’ होता सालेह अब्देसलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2016 02:51 AM2016-03-21T02:51:28+5:302016-03-21T02:51:28+5:30
पॅरिस हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार आणि संशयित आरोपी सालेह अब्देसलाम याने आपण ‘आत्मघातकी बॉम्बर’ होतो, अशी कबुली दिली असून, ऐनवेळी आपले मतपरिवर्तन झाल्याचेही स्पष्ट केले
ब्रुसेल्स/पॅरिस : पॅरिस हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार आणि संशयित आरोपी सालेह अब्देसलाम याने आपण ‘आत्मघातकी बॉम्बर’ होतो, अशी कबुली दिली असून, ऐनवेळी आपले मतपरिवर्तन झाल्याचेही स्पष्ट केले आहे. गेल्या शुक्रवारी त्याला ब्रुसेल्स येथे पकडण्यात आले. त्याची फ्रान्सचे तपास अधिकारी कसून चौकशी करीत आहेत. या चौकशीत त्याने ही माहिती उघड केली. स्टेडियममध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी आपण तेथे गेलो होतो; पण ऐनवेळी आपले मतपरिवर्तन झाले आणि बॉम्बस्फोट घडविला नाही, असे त्याने कबूल करून टाकले, खरे तर स्टेडियममध्ये तो स्वत:ला उडवून देणार होता.
पॅरिसमध्ये गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात १३० जण ठार झाले होते. युरोपात २००४ साली झालेल्या हल्ल्यानंतर हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला होता.