सलमान खानमुळे वाढतेय पाकिस्तानातील गुन्हेगारी

By admin | Published: March 6, 2017 11:58 AM2017-03-06T11:58:23+5:302017-03-06T12:33:05+5:30

अभिनेता सलमान खानच्या सिनेमांमुळे गुन्हेगारी वाढत आहे असं विधान अभिनेत्री आणि गायिका...

Salman Khan increases Pak's crime | सलमान खानमुळे वाढतेय पाकिस्तानातील गुन्हेगारी

सलमान खानमुळे वाढतेय पाकिस्तानातील गुन्हेगारी

Next
>ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 6 - अभिनेता सलमान खानच्या सिनेमांमुळे पाकिस्तानात गुन्हेगारी वाढत आहे असं विधान पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका राबी पीरजादाने केलं आहे. 
 
लाहोरमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, पाकिस्तानचा तरूणवर्ग बॉलीवुडचे सिनेमे पाहून वाया जातोय, बॉलीवुडचे सर्व सिनेमे गुन्हेगारी केंद्रीत असतात. विशेषतः सलमान खानच्या सिनेमांमध्ये जास्तच गुन्हेगारी दाखवली जाते असं त्या म्हणाल्या.  
   
भारतीय फिल्मकार आणि बॉलीवुडचे लोकं त्यांच्या तरूणवर्गाला काय शिकवत आहेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. एक वेळी होती जेव्हा पाकिस्तानात सामाजिक मुद्द्यांवर आधारित सिनेमे बनायचे पण बॉलीवुडमुळे सर्व समीकरणं बदलली.
 
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. यामध्ये तीने सलमान खानसह ऋतिक रोशन, इमरान हाशमी आणि रितेश देशमुख यांची खिल्ली उडवली होती.     

Web Title: Salman Khan increases Pak's crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.