Samoa PM Oath Ceremony : पराभूत पंतप्रधान सत्ता सोडेनात, संसदेलाच ठोकलं टाळं; पहिल्या महिला पंतप्रधानांनी तंबूतच घेतली पदाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 01:20 PM2021-05-25T13:20:09+5:302021-05-25T13:21:50+5:30

Samoa PM Oath Ceremony : First Woman PM Elect Dismisses Rivals Electoral Games Amid Vote Crisis जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेला समोआ हा देश सध्या राजकीय घडामोंडींमुळे आहे चर्चेत.

Samoas First Woman PM Elect Dismisses Rivals Electoral Games Amid Vote Crisis | Samoa PM Oath Ceremony : पराभूत पंतप्रधान सत्ता सोडेनात, संसदेलाच ठोकलं टाळं; पहिल्या महिला पंतप्रधानांनी तंबूतच घेतली पदाची शपथ

Samoa PM Oath Ceremony : पराभूत पंतप्रधान सत्ता सोडेनात, संसदेलाच ठोकलं टाळं; पहिल्या महिला पंतप्रधानांनी तंबूतच घेतली पदाची शपथ

Next
ठळक मुद्देजगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेला समोआ हा देश सध्या राजकीय घडामोंडींमुळे आहे चर्चेमाजी पंतप्रधानांचा निवडणुकीतील पराभवानंतरही सत्ता सोडण्यास नकार.

जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या सिमोआ हा देश सध्या देशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच या ठिकाणी निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकांचे निकालही जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये देशाला पहिल्या महिलापंतप्रधान मिळाल्या. परंतु आपली सत्ता गेल्यानं नाराज असलेले माजी पंतप्रधान ट्विलाएपा सैलेले मैलिलेगाओई (Tuilaepa Sailele Malielegaoi) यांनी आपलं पद सोडण्यास नकार दिला आहे. तसंच देशातील राजकीय परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की पंतप्रधानपदी निवड झालेल्या गईं नाओमी मताफा (Naomi Mataafa) यांना संसदेच्या बाहेरच तंबूमध्ये शपथविधी सोहळा उरकावा लागला. दरम्यान, विरोध करण्यासाठी माजी पंतप्रधानांच्या पक्षानं थेट संसदेलाच टाळं ठोकलं. त्यानंतर आता देशासमोर नेतृत्वाचं संकट उभं ठाकलं आहे. Samoa PM Oath Ceremony : First Woman PM Elect Dismisses Rivals Electoral Games Amid Vote Crisis.


समोआमध्ये सत्तेत असलेल्या ह्युमन राईट्स प्रोटेक्शन पार्टीचा (HRPP) मताफा यांच्या FAST पार्टीनं पराभव केला होता. एप्रिल महिन्यात या ठिकाणी निवडणुका पार पडल्या. दरम्यान विजयानंतर सोमवारी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी त्या जेव्हा पोहोचल्या तेव्हा त्यांना संसेदत जाऊ देण्यात आलं नाही. याशिवाय पराभूत झालेल्या पक्षानं विरोध करण्यासाठी थेट संसदेलाच टाळं ठोकलं. त्यानंतर संसेदच्या बाहेर तंबूमध्ये मताफा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. तर दुसरीकडे मैलिलेगाओई हा शपथविधी सोहळा मानण्यास तयार नाहीत. 

चुरशीची लढत

HRPP आणि FAST या दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली होती. यादरम्यान दोन्ही पक्षांना २५-२५ जागांवर विजय मिळाला होता. परंतु एका अपक्ष उमेदवारानं FAST पार्टीला पाठिंबा दिला. त्यानंतर HRPP नं न्यायालयाचीही मदत घेतली. तसंच महिला खासदार कोट्याचं पालन करण्यात आलं नसल्याचा दावाही केला. परंतु त्यानंतर देशात निवडणूक आयोगानं एप्रिल महिन्याच्या मतदानाच्या निकालांना रद्द केलं आणि २१ मे रोजी नव्या निवडणुकांची घोषणा केली. परंतु त्यानंतर न्यायालयानं एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या निवडणुका योग्य असल्याचं म्हटलं. मैलिलेगाओई हे तब्बल २२ वर्षे सत्तेत होते. सामोआ हा देश १९६२ मध्ये न्यूझीलंडपासून स्वतंत्र झाला होता. 

Web Title: Samoas First Woman PM Elect Dismisses Rivals Electoral Games Amid Vote Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.