Sana Gulwani : पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीने रचला इतिहास, सनाने करुन दाखवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:50 AM2021-09-21T08:50:23+5:302021-09-21T08:52:15+5:30
एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील ही परीक्षा अतिशय अवघड असल्याचे दिसून येते. कारण, केवळ 2 टक्क्यांपेक्षाही कमी उमेदवारांना या परीक्षेत यश मिळाले आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्येहिंदूंच्या प्रशंसनीय कामाचं भारतात निश्चितच कौतुक केलं जातं. आताही, पाकिस्तानमध्ये एका हिंदू मुलीने इतिहास रचला आहे. सना रामचंद्र गुलवानी असे या मुलीचं नाव असून ती 27 वर्षांची आहे. डॉ. सना सेंट्रल सुपेरियर सर्व्हीसेसची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांचा एका हिंदुला या परीक्षेत असं यश मिळालं आहे. दरम्यान, परीक्षेतील यशानंतर सनाची नियुक्तीही निश्चित झाली आहे.
एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील ही परीक्षा अतिशय अवघड असल्याचे दिसून येते. कारण, केवळ 2 टक्क्यांपेक्षाही कमी उमेदवारांना या परीक्षेत यश मिळाले आहे. सेंट्रल सुपेरियर सर्व्हीसेस म्हणजेच पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेतील नियुक्तींची परीक्षा असून भारतातील युपीएससी दर्जाची तुलना या परीक्षेसोबत करता येईल. सना ने सिंध प्रांतातील रुरल जागेतून परीक्षेत सहभाग घेतला होता. पाकिस्तान प्रशासकीय सर्व्हिसेसच्या अंतर्गत ही जागा भरण्यात येते. माझा हा पहिलाच प्रयत्न होता, आणि मी जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरलं, अशी प्रतिक्रिया सनाने परीक्षा पास झाल्यानंतर दिली आहे. सनाने वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करावे, अशी तिच्या पालकांनी इच्छा होती. त्यामुळे सनाने प्रशासकीय सेवेत जाऊ नये, असेही त्यांना वाटत.
सनाने आई-वडिलांची इच्छा आणि स्वत:चं स्वप्नही पूर्ण केलं आहे. पालकांच्या इच्छेनुसार मेडीकलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सीएसएस परीक्षेतून प्रशासकीय सेवेत स्थान निश्चित केले. सना ने पाच वर्षांपूर्वी शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटीमधून बॅचलर ऑफ मेडिसिन विषयात पदवी घेतली होती. त्यानंतर, त्या सर्जनही बनल्या. युरोलॉजीमध्ये मास्टर डिग्री घेतल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेची तयारी सुरू करत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.