पार्टीत दारू संपली म्हणून सॅनिटायझरने नशा केली; सात जाणांचा मृत्यू, दोघे कोमात
By बाळकृष्ण परब | Published: November 22, 2020 02:07 PM2020-11-22T14:07:06+5:302020-11-22T14:09:15+5:30
International News : पार्टीदरम्यान, दारू संपल्याने पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी नशेसाठी सॅनिटायझर प्राशन केले. मात्र सॅनिटायझर पिल्याने लोकांची तब्येत अचानक बिघडली.
मॉस्को - व्यसन हे वाईट असते, असे वारंवार सांगितले जाते. बऱ्याचदा अशा व्यसनाची चटक जीवावरही बेतू शकते. असाच एक प्रकार रशियातील तातिन्सकी जिल्ह्यामधील तोमतोर गावातील एका पार्टीत घडला आहे. येथे सुरू असलेल्या पार्टीदरम्यान, दारू संपल्याने पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी नशेसाठी सॅनिटायझर प्राशन केले. मात्र सॅनिटायझर पिल्याने लोकांची तब्येत अचानक बिघडली. बेशुद्ध पडत असलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे ७ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण कोमामध्ये गेले.
मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीत सहभागी झालेल्या लोकांनी सॅनिटायझर प्राशन केले होते. त्यामध्ये ६० टक्के मिथेनॉल होते. ज्याचा वापर कोरोनाच्या संक्रमणकाळात हँड क्लिनर म्हणून करण्यात येत होता.
डेलीमेलमधील रिपोर्टनुसार रशियातील तातिन्सकी जिल्ह्यातील तोमतोर गावात पार्टीदरम्यान, लोक बेशुद्ध पडून कोसळू लागल्याने गोंधळ माजला. हे सर्व लोक पार्टीमध्ये मद्याची मागणी करत होते. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या कुणीतरी सॅनिटायझरची बातटी आणली. मद्यासाठी आतूर झालेल्या लोकांनी हे सॅनिटायझर पिले. त्यानंतत तब्येत बिघडून तीन जणांचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर सहा जणांना एअरक्राफ्टच्या मदतीने स्थानिक राजधानी याकुत्स्क येथे नेण्यात आले.
तिथे उपचारादरम्यान अजून चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सॅनिटायझरच्या माध्यमातून विषबाधेबद्दल गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर रशियन सरकारने नशा करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांत रशियामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. रशिामध्ये आतापर्यंक कोरोनाचे २० लाख ६४ हजार ७४८ रुग्ण सापडले आहेत. तर ३५ हजार ७७८ जणांचा मृत्यू झाला आहे.