व्यंग कुत्र्याला दत्तक दिले जाणार
By admin | Published: March 11, 2017 12:15 AM2017-03-11T00:15:03+5:302017-03-11T00:15:03+5:30
पिकासो या दहा महिन्यांच्या कुत्र्याच्या आयुष्यात सध्याचे दिवस खूप आनंदी आहेत. अर्थात यासाठी त्याने ओरेगॉनच्या श्वानांना वाचवणाऱ्या गटाचे आभार मानले असतील
पिकासो या दहा महिन्यांच्या कुत्र्याच्या आयुष्यात सध्याचे दिवस खूप आनंदी आहेत. अर्थात यासाठी त्याने ओरेगॉनच्या श्वानांना वाचवणाऱ्या गटाचे आभार मानले असतील. पिकासो हा पिटबुल-टेरिअर अशा मिश्र संकरातून जन्माला आला असून त्याचा चेहरा खूपच व्यंग असलेला आहे. त्याच्याकडे बघितल्यावर त्याचे नाक उजवीकडे जाताना दिसते तर जबडा डावीकडे. त्याच्या वरच्या सूळ््याची जागा योग्य नाही. तो खालच्या जबड्याच्या हिरड्यात घुसताना दिसतो. पिकासोचे आरोग्य चांगले आहे, असे लव्हेबल डॉग रिस्क्यूच्या कार्यकारी संचालक लिएसल विलहार्ड्ट यांनी सांगितले. पिकासो कडेकडेने खाऊ शकतो, परंतु तो खाताना खूपच गचाळपणा करतो, पाणी पितानाही त्याची अशीच अवस्था असते, असे त्या म्हणाल्या.
पोर्टव्हिले, कॅलिफोर्नियामध्ये गेल्या वर्षी कुत्र्याची पाच पिले जन्माला आली त्यात पिकासोही होता. ज्याच्या घरी पिकासो जन्मला तो मालक पिकासो व पाब्लो यांना विकू शकला नाही. त्यामुळे त्या दोघांना पोर्टव्हिले अॅनिमल सेंटरमध्ये ठेवण्यात आले. या दोघांनाही दयामरण दिले जाणार होते. पण त्याआधीच विलहार्डट् यांना या दोन कुत्र्यांबद्दल अॅनिमल सेंटरचे कार्यकर्ते शॅनोन कॉर्बिट यांच्याकडून समजले. मी तिला विचारले की तुमच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते अशी कोणती कुत्री आहेत का? तसे असेल तर आम्ही त्यांची काळजी घेऊ. विलहार्डट् म्हणाल्या की चेहरा विद्रुप असलेला असा एक कुत्रा आहे. त्याचा चेहरा बघून मी त्याच्या प्रेमात पडले. दयामरण दिले जाणार असलेल्या जनावरांच्या यादीत पिकासो आणि पाब्लो यांची नावे पाहून मी त्यांना दत्तक घेतले. पिकासोचा विचित्र चेहराच सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्याच्या चेहऱ्याची विद्रुपता ही वरवरची आहे. त्याचा जबडा छान असून विद्रुपता ही त्याच्या नाकाच्या वरच्या भागात आहे. त्याच्या जबड्याची बिजागर विद्रुप नाही. तो सहजपणे जबडा उघडू शकतो. त्याचा वरचा सुळा काढण्यासाठी त्याचे दात काढण्याची विचार आहे. पिकासोचा दात काढला की पिकासो आणि पॅब्लो यांना दत्तक दिले जाईल.