आपले मतदान करा अखेरपर्यंत ट्रॅक, सत्या नडेला यांचे ‘इलेक्शन गार्ड’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 04:03 AM2019-05-08T04:03:23+5:302019-05-08T04:07:50+5:30

केम्ब्रिज एनालिटिका घोटाळ्यानंतर निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा होऊ लागली असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक सॉफ्टवेअर कीट एसडीके जारी केली आहे.

Satya Nadeela's 'Election Guard' track your vote till last | आपले मतदान करा अखेरपर्यंत ट्रॅक, सत्या नडेला यांचे ‘इलेक्शन गार्ड’

आपले मतदान करा अखेरपर्यंत ट्रॅक, सत्या नडेला यांचे ‘इलेक्शन गार्ड’

Next

सीटल (अमेरिका) : केम्ब्रिज एनालिटिका घोटाळ्यानंतर निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा होऊ लागली असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक सॉफ्टवेअर कीट एसडीके जारी केली आहे. ‘इलेक्शन गार्ड’ नावाने जारी केलेली ही किट लवकरच गीटहबवर आॅनलाईन असेल. कंपनीच्या डिफेन्स डेमोक्रसीचा हा एक भाग आहे.

नडेला यांचे म्हणणे आहे की, एसडीके सध्याच्या प्रणालीत, आॅफ-द-शेल्फ हार्डवेअर, पेपर बॅलेट सिस्टीममध्ये एकीकृत केली जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीला एका वेब पोर्टलवर एका कोडचा उपयोग करता येईल.


आपले मतदान केल्यानंतर कोणत्याही प्रक्रियेत काही छेडछाड होत नाही ना? हे निश्चित करण्याची मदत या तंत्रज्ञानाने मिळते. प्रत्येक मतदाराचे मत गोपनीय राहते. त्यासाठी ते एन्क्रिप्टेड (सुरक्षित राखण्याची क्रिया) आहे. तरीही ही सिस्टीम सरकारी संघटना आणि तिसऱ्या पक्षाला या प्रक्रियेचे आॅडिट करण्याची संधी देते.

काय आहे यात?

कंपनीच्या प्रवक्त्याने एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, यातून मतदानाची योग्य गणना होत आहे काय? याची माहिती या माध्यमातून मतदाराला मिळण्याची परवानगी दिली जाते.


पोर्टलचा उपयोग करून आपण आपल्या स्थानिक उमेदवारांना शोधू शकता. आपल्या घरातून त्यांच्याबाबत अधिक जाणून घेऊ शकतात. आपण जेव्हा आपली निवड निश्चित करता तेव्हा एका क्यूआर कोडसह आपण एक प्रिंट घेऊ शकता. तसेच आपण जेव्हा मतदान केंद्रावर जाता तेव्हा बटन न दाबता कोड स्कॅन करायचा आहे.
अमेरिकेतील २०२० च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्ट याची डिझाईन करीत आहे.

Web Title: Satya Nadeela's 'Election Guard' track your vote till last

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.