Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:47 AM2024-06-14T10:47:03+5:302024-06-14T10:47:41+5:30
Big Blow to USA from Saudi Arab: हा करार अमेरिकेच्या जगभरातील आर्थिक वर्चस्वासाठी एक मोठा मैलाचा दगड ठरला होता, मात्र आता हा करार पुन्हा होण्याची चिन्हे धुसरच आहेत.
Big Blow to USA from Saudi Arab: सौदी अरेबियाचीचीन आणि रशियाशी जवळीक सतत वाढत आहे. आता सौदीच्या बाजारपेठेत अमेरिकेचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतोय. आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवत असतानाच सौदी रशिया, चीन आणि जपानशी आपले संबंध मजबूत करत आहे. या संदर्भात एक पाऊल पुढे टाकत सौदी सरकारने अमेरिकेला एक मोठा धक्का दिला आहे. सौदीने अमेरिकेसोबतचा ५० वर्षांचा पेट्रो-डॉलर करार वाढवण्यास नकार दिला आहे. हा करार ९ जून रोजी संपला आहे. जगभरातील व्यवसायासाठी यूएस डॉलरऐवजी इतर चलने वापरण्यासाठी प्रोत्साहन म्हणून याकडे पाहिले जाते. त्याचा परिणाम थेट अमेरिकेवर होऊ शकतो. हा करार अमेरिकेच्या जगभरातील आर्थिक वर्चस्वासाठी एक मोठा मैलाचा दगड ठरला होता, मात्र आता हा करार पुन्हा होण्याची चिन्हे धुसरच आहेत.
As much as I'd like to believe this to be true, this 50-year expiry date on a petrodollar agreement is, as far as I can see and after quite a bit of research, purely made up (like many things this "BRICS News" account posts) 🤷♂️ https://t.co/951BbQJdPL
— Arnaud Bertrand (@RnaudBertrand) June 13, 2024
पेट्रो डॉलर डील म्हणजे काय?
इन्व्हेस्टोपेडियाच्या माहितीनुसार, १९७०च्या दशकात अमेरिका व्यापारासाठी सोन्याच्या मानकांपासून दूर गेल्यानंतर पेट्रो डॉलरचा करार अस्तित्वात आला. इस्त्रायल युद्धानंतर चालू असलेल्या तेलाच्या संकटानंतर अमेरिकेने सौदी अरेबियाशी पेट्रो डॉलरचा करार केला. या करारानुसार सौदी अरेबियाने आपले सोने जगभरात डॉलरमध्ये विकावे असा करार आहे. या कराराच्या बदल्यात अमेरिकेने सौदी अरेबियाला आपल्या सुरक्षेची हमी दिली होती आणि त्याचे अनेक फायदे अमेरिकेलाही मिळाले. सर्वप्रथम त्यांना सौदीचे तेल मिळाले. दुसरे म्हणजे, त्यांचा चलन साठा जगभरात वाढू लागला. पण आता सौदीच्या नव्या निर्णयाने अमेरिकेचे जागतिक बाजारपेठेतील महत्त्व हळूहळू कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
करार संपल्यानंतर तेलाची विक्री कशी?
सौदी अरेबिया हा जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. हा देश अनेक देशांना त्याचे तेल विकतो. बिरिक्स न्यूजनुसार, सौदी अरेबिया आता फक्त यूएस डॉलरऐवजी चीनी RMB, युरो, येन, रुपया आणि युआन यासह अनेक चलनांमध्ये तेलाचा व्यापार-विक्री करणार आहे.