पतीने तलाक देण्यास दिला नकार, पत्नीने दिली न्यूड होऊन रस्त्यावर फिरण्याची धमकी आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 12:11 PM2022-03-25T12:11:15+5:302022-03-25T12:13:47+5:30
Saudi Arab : गल्फ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, सौदी अरबमधील महिलेने पतीला धमकावलं की, तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे.
सौदी अरबमधून (Saudi Arab) नेहमीच काहीना काही विचित्र किंवा धक्कादायक घटना समोर येत असतात. कधी नात्यांबाबत तर कधी येथील कठोर नियमांबाबत आपण ऐकतच असतो. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने घटस्फोटासाठी (Divorce) पतीला अजब धमकी दिली. पतीने पत्नीने दिलेली धमकी ऐकताच तिला घटस्फोट देऊन टाकला.
गल्फ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, सौदी अरबमधील महिलेने पतीला धमकावलं की, तिला त्याच्यापासून घटस्फोट हवा आहे. पण पती या घटस्फोटाला तयार झाला नाही तेव्हा महिलेने पतीला धमकी दिली की, ती न्यूड होऊन रस्त्यावर फिरेल. ही धमकी ऐकल्यानंतर पतीला नाइलाजास्तव पत्नीला घटस्फोट द्यावा लागला.
यानंतर पतीने शरिया कोर्टाकडे धाव घेतली. त्याने कोर्टात केस दाखल करून हा घटस्फोट रद्द करण्यासाठी अर्ज दिला. तो म्हणाला की, हा घटस्फोट त्याच्या इच्छेविरूद्ध होता. मात्र, कोर्टाने सांगितलं की, घटस्फोटासाठी शरियाचा आधारपूर्ण झाला आहे.
सौदी अरबच्या सांख्यिकी प्राधिकरणानुसार, सौदी अरबमध्ये घटस्फोटाच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. डेटानुसार, इथे प्रत्येक तासाला सात घटस्फोटाच्य केसेस समोर येत आहेत. अथॉरिटीने सांगितलं की, गेल्या १० वर्षात इथे घटस्फोटाच्या केसेस ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत.