विनामीटर टॅक्सी चालवली तर पॅसेंजरला द्यावी लागेल 'फ्री राईड'; 'या' देशानं लढवली जबरदस्त शक्कल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 11:59 AM2022-06-02T11:59:06+5:302022-06-02T12:02:05+5:30

भारतात ऑटो, टॅक्सी आणि कॅबमधून प्रवास करणाऱ्यांसोबत सर्वात मोठी समस्या प्रवासी भाड्यावरुनच होते. चालकासोबत अनेदका प्रवासी भाड्यावरुन वाद झाल्याचीही अनेक प्रकरणं वारंवार समोर येत असतात.

saudi arabia new rules for taxi drivers without meter driver have to give free ride to passengers | विनामीटर टॅक्सी चालवली तर पॅसेंजरला द्यावी लागेल 'फ्री राईड'; 'या' देशानं लढवली जबरदस्त शक्कल!

विनामीटर टॅक्सी चालवली तर पॅसेंजरला द्यावी लागेल 'फ्री राईड'; 'या' देशानं लढवली जबरदस्त शक्कल!

Next

भारतात ऑटो, टॅक्सी आणि कॅबमधून प्रवास करणाऱ्यांसोबत सर्वात मोठी समस्या प्रवासी भाड्यावरुनच होते. चालकासोबत अनेदका प्रवासी भाड्यावरुन वाद झाल्याचीही अनेक प्रकरणं वारंवार समोर येत असतात. इथं एखादी टॅक्सी किंवा ऑटो मिळालीच तरी हाताच्या बोटावर मोजाण्याइतकेच चालक मीटरवर भाडे आकारण्यास तयार होतात. अर्थात मोठ्या शहरांमध्ये मीटरवरच रिक्षा, टॅक्सी चालत असली तरी इतर तुलनेनं लहान शहरं आणि गावखेड्यात मीटरवर वाहतूक सेवा चालत नाही. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्रवासी संबंधित वाहतूक विभागाकडे करत असतात. पण त्यातूनही काही मार्ग निघत नाही. दुसरीकडे सौदी अरेबियात ऑटो आणि टॅक्सी चालकांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी प्रशासनानं नवा कायदा केला आहे. यात जर एखाद्या कॅब किवा ऑटो चालकानं विना मीटर चालवली तर प्रवाशांना चालकाला प्रवासाचं भाडं अजिबात द्यावं लागणार नाही. 

१९९२९ क्रमांकावर फोन करुन करा तक्रार
रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाच्या ट्रान्सपोर्ट जनरल अथॉरिटीने टॅक्सी चालकांशी संबंधित नव्या कायद्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. या कायद्यानुसार टॅक्सी चालकांना फक्त मीटरनेच चालावे लागणार आहे. जर एखाद्या वाहनचालकानं या नियमाचं उल्लंघन केलं तर प्रवासी त्याबाबत 19929 या क्रमांकावर तक्रार करू शकतात. अशा परिस्थितीत प्रवाशाला त्या प्रवासासाठी कोणतंही भाडं द्यावं लागणार नाही.

प्रवाशांना सुविधा देणंही गरजेचं
कायद्यात टॅक्सीबाबत आणखी अनेक नियम करण्यात आले आहेत. म्हणजेच ड्रायव्हर्सनाही अनेक प्रकारची तांत्रिक सुविधा कॅबमध्ये उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. या अंतर्गत त्यांच्याकडे ई-पेमेंट उपकरण असणं आवश्यक आहे. प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा द्यावी लागेल. टॅक्सीत कॅमेरा असावा. याशिवाय ट्रॅकिंग डिव्हाइस असणंही बंधनकारक असणार आहे.

प्रत्येक चालकाला गणवेश अनिर्वाय
कायद्यात प्रत्येक श्रेणीतील टॅक्सी चालकांना गणवेश परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर चालक गणवेश नसलेला असेल तर त्याचीही तक्रार करता येणार आहे. दोषी आढळणाऱ्या चालकाला दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे.  

Web Title: saudi arabia new rules for taxi drivers without meter driver have to give free ride to passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.