ग्रीन लाइफस्टाइलची तयारी! सौदी अरेबिया समुद्रसपाटीपासून 500 मीटर उंचीवर वसवणार आधुनिक नवीन शहर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:55 PM2022-07-26T19:55:53+5:302022-07-26T19:57:03+5:30

Saudi Arabia : सौदी क्राउन प्रिन्स यांनी शिन्हुआ सांगितले की, सध्या 10 पेक्षा जास्त देशांच्या संघांनी प्रकल्पाच्या बांधकामात भाग घेतला आहे.

saudi arabia pince mohammad bin salman unveils design of new city to promote green lifestyle | ग्रीन लाइफस्टाइलची तयारी! सौदी अरेबिया समुद्रसपाटीपासून 500 मीटर उंचीवर वसवणार आधुनिक नवीन शहर

ग्रीन लाइफस्टाइलची तयारी! सौदी अरेबिया समुद्रसपाटीपासून 500 मीटर उंचीवर वसवणार आधुनिक नवीन शहर

Next

सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल अजीझ यांनी पर्यावरणातील संकट दूर करण्यासाठी आणि हरित जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी 'द लाइन' या शहराच्या डिझाइनचे अनावरण केले आहे. सौदी प्रेस एजन्सीला त्यांनी सांगितले की, समुद्रसपाटीपासून 500 मीटर उंचीवर बांधलेले हे शहर लोकांच्या जीवनावर केंद्रित असलेली क्रांती आहे, आजूबाजूच्या निसर्गाचे रक्षण करताना अभूतपूर्व शहरी जीवनाचा अनुभव प्रदान करणार आहे.

वृत्तसंस्था शिन्हुआच्या रिपोर्टनुसार, भविष्यात शहरी समुदाय रस्ते, कार आणि हरितगृह वायू उत्सर्जनापासून कसे मुक्त होतील, हे डिझाइन दर्शवते. डिझाइननुसार, रहिवाशांना 20-मिनिटांच्या एंड-टू-एंड ट्रान्झिटसह हाय-स्पीड रेल्वे व्यतिरिक्त, पाच मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर सर्व सुविधा उपलब्ध असतील. हे 100 टक्के अक्षय ऊर्जेवर (Renewable energy) असणार आहे. निसर्गाला विकासाच्या पुढे ठेवेल आणि 95 टक्के जमिनीच्या संवर्धनासाठी हातभार लावेल, असे डिझाइनवरून समजते. 'द लाइन' अखेरीस 9 मिलियन रहिवाशांना सामावून घेईल आणि ते 34 चौरस किमीच्या फूटप्रिंटवर बांधले जाईल.

सौदी क्राउन प्रिन्स यांनी शिन्हुआ सांगितले की, सध्या 10 पेक्षा जास्त देशांच्या संघांनी प्रकल्पाच्या बांधकामात भाग घेतला आहे. डिझाइन प्रत्यक्षात आणण्यासाठी भविष्यात शहराच्या बांधकामात सहभागी होण्यासाठी उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय उपक्रम आणि कंपन्यांचे त्यांनी स्वागत केले. ते म्हणाले, "शहर डिझाइन पारंपरिक फ्लॅट, आडव्या शहरांना आव्हान देईल आणि निसर्ग संवर्धन आणि मानवी जीवन वाढविण्यासाठी एक मॉडेल तयार करेल."

दरम्यान, सौदी क्राउन प्रिन्स यांनी 2017 मध्ये या निओम प्रकल्पाची घोषणा केली होती. सौदी अरेबिया हा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे. मात्र, भविष्यात होणारे बदल पाहता सौदीने अर्थव्यवस्थेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात तेलाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असून नव्या तंत्रज्ञानामुळे तेलावरील अवलंबित्व कमी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सौदी अरेबिया आपल्या अर्थव्यवस्थेची रचना करत आहे.

Web Title: saudi arabia pince mohammad bin salman unveils design of new city to promote green lifestyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.